सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रगती बगल यांची माहिती
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. अँन्ड ए.बोर्ड) यांच्याकडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी. डी. सी. अँन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दि. २३, २४ व २५ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेसाठी परिक्षार्थीकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा २०२५ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ७ मार्च २०२५ रात्री ८ वाजेपर्यत वाढविण्यात आली आहे. बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि. १३ मार्च २०२५ रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ई ब्लॉक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा कार्यालयीन दूरध्वनी (क्र. ०२१७- २६२९७४९) क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रगती बगल यांनी कळविले आहे.