माजी सैनिकांच्या विधवा महिलांसाठी जिल्हा स्तरावरील महिला संघटना स्थापित करावी

जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे आवाहन

 अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : जिल्हयातील सर्व माजी सैनिकांच्या विधवा महिलांच्या कल्याणासाठी संघटना स्थापित करण्याबाबत सैनिक कल्याण विभागाचे संचालक यांनी सूचना दिलेल्या आहेत.

माजी सैनिकांच्या विधवा महिलांसाठी जिल्हा स्तरावरील योग्य व तत्काळ कार्यवाही करुन संघटना स्थापित करावी. माजी सैनिकांच्या विधवा महिलांमध्ये माजी सैनिकांच्या विधवांसाठी देण्यात येणा-या उपाययोजना करण्यासाठी दररोज सकाळी ११ ते २ यावेळेत  सैनिकी मुलींचे वसतिगृह, सुंदरमनगर शासकीय आयटीआयच्या पाठीमागे विजयपूर रोड, सोलापूर येथे माजी सैनिक विधवा महिलांचे मेळाव्याचे आयोजन केले आहे.

तरी जास्तीत जास्त संख्येने माजी सैनिकांच्या विधवांनी सैनिकी मुलींचे अशासकीय वसतीगृह अधिक्षिका आशादेवी सिध्दलिंगप्पा किवडे यांच्याशी (मो.नं. ९५२७५८४०३४) या भ्रमणध्वनीवर तत्काळ संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *