समाधान आश्रमात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

समाधान आश्रम ध्यान मंदिरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : तळेहिप्परगा येथील समाधान आश्रमातील समाधान आश्रम ध्यान मंदिरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दि. १५,१६  फेब्रुवारी रोजी विविध  धार्मिक, समाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

परमपूज्य श्री म.नि.प्र.मौन तपस्वी श्‍वेतशांत श्री श्री श्री जडेय शांतलिंगेश्‍वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात मागील वर्षी निर्माण केलेल्या तळेहिप्परगा येथील समाधान आश्रमातील ध्यानमंदिराला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त वीरशैव लिंगायत समाजातील वधू-वरांचा सामुदायिक विवाहाचे आयोजन रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.  दि. १५ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गुरूदेव सेवा संस्थेचे डॉ.दामा आणि सिध्देश्‍वर किणगी यांनी दिली.

श्री गुरूदेव सेवा संस्थेच्यावतीने सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील तळेहिप्परगा गावात उभारण्यात आलेल्या समाधान आश्रमात ध्यान मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याला एकवर्ष पूर्ण झाले आहे. मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्‍वर महास्वामी यांच्या सानिध्यात दि. १५ आणि १६ फेब्रुवारी या दोन दिवसात विविध उपक्रम होणार आहेत. त्यामध्ये दि. १५ रोजी सकाळी इष्टलिंग धारण कार्यक्रम, आरोग्य शिबीर, महास्वामीजींचे तुलाभार, पुस्तक प्रकाशन, सत्कार समारंभ आणि प्रवचन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.

दि. १६ फेब्रुवारी रोजी वीरशैव लिंगायत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाहासाठी इच्छुक वधू-वरांनी दि. ६ फेब्रुवारीपर्यत आपली नावे योग्य कागदपत्रांसह नोंद करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी तोग्गीहळ्ळी पंच मठाचे पूज्य श्री ष.ब्र.संगमेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, श्री हिरेमठ जडे येथील पूज्य श्री ष ब्र.धनबसव अमरेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचे आर्शिवचन लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. दामा दांम्पत्य, राजू हौशेट्टी, सिध्दू किणगी, मल्लू बिराजदार, महेश पाटील, संगनबसव स्वामी, दिपक टक्कळकी, तेल्लूर बंधू, अक्कलकोटचे बसू माशाळे,  दत्तू कुमार साखरे, कांतू धनशेट्टी आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *