सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार, दि. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.

या लोकशाही दिनात मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाच्या निवेदनावर केलेल्या कारवाई अहवाल तसेच  माहिती अधिकार अधि.-२००५ अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे. अशी  माहिती   निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *