सोलापुरात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव; दादांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला… अन बापूंनी दिले अनुमोदन..!
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी (दि. ३ जानेवारी २०२५ ) सोलापुरात नियोजन समितीच्या सभागृहात उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. ही बैठक जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी आमदार समाधान आवताडे (दादांनी) यांनी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला आमदार सुभाष देशमुख (बापूंनी) अनुमोदन दिले.
आमदार समाधान आवताडे (दादांनी) यांनी मंत्री महोदयांकडे सोलापूर जिल्ह्याला या हंगामात पाण्याचे पाच आवर्तन सोडण्याची मागणी केली. तसेच मागील दोन वर्षांपूर्वी पाण्याची पाच आवर्तने दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला आणि यावर्षीही पाच आवर्तने देण्याची मागणी केली. आमदार समाधान आवताडे (दादांनी) यांनी मांडलेल्या या अभिनंदनाच्या ठरावाला आमदार सुभाष देशमुख (बापूंनी) अनुमोदन दिले. तसेच उजनी प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्या बरोबरच कालव्यातील झाडे झुडपे काढण्याची सूचना केली.
उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठकीत लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्यांनी विविध मुद्दे मांडले…
- याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांनी उजनी धरणातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मोबदला न मिळाल्याने स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली.
- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही शेतकऱ्यांना उजनी धरणातून पावसाळ्यापर्यंत पाणी मिळावे, यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी केली.
- आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील एकरूख पाणीपुरवठा योजनेत पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
- माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी सिंचन आराखड्यातील तरतुदीप्रमाणे सर्वांना सम प्रमाणात पाणी देण्याची मागणी केली.
- करमाळ्याचे आमदार नारायणआबा पाटील यांनी करमाळा तालुक्याला पुरेसे पाणी मिळावे तसेच उजनी प्रकल्पातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी उचल म्हणून करमाळा तालुक्याला उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची मागणी केली.
- आमदार अभिजीत पाटील यांनी सीना माढा सिंचन योजनेअंतर्गत माढा तालुक्यातील चार गावांना पाणीपुरवठा करावा. यासाठी प्रकल्पातून फक्त ८००मीटर पाईपलाईनची आवश्यकता असून, ती पाईपलाईन टाकून द्यावी, अशी मागणी केली.
- समितीचे अशासकीय सदस्य यांनी भीमा नदीला कालव्याचा दर्जा द्यावा. कारण सोलापूर महापालिकेचे पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भीमा नदी प्रवाही राहील. या दृष्टीने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.