– महाराष्ट्र फौंडेशनच्यावतीने गौरव

सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील माळीनगर महाराष्ट्र फौंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त गांधी नाथा रंगजी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शिवानंद अप्पासाहेब सुतार यांचा राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना फेटा, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक आर्वे, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, सिनेअभिनेता अक्षय बनकर, बालरोगतज्ञ डॉ. ऐकतपुरे, महाराष्ट्र फौंडेशन संस्थापक रणजित लोहार, मेजर अमित ठाकूर यांची उपस्थिती होती.
राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गांधी नाथा दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधी नाथा रंगजी विद्यालयाचे अध्यक्ष संजय गांधी, मुख्याध्यापिका स्मिता पुरवंत, सरोजिनी मुलिटी, प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.