SOLAPUR RTO : आरटीओची चारचाकीसाठी नवीन मालिका सुरू

प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर चारचाकी मालिका सुरू; आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी (MH13 ES) मालिका सुरू करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चार चाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या दरम्यान विहीत नमुन्यातील अर्जांमध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी (केवळ क्र. १६ अन्वये जारी झालेले डीडी), पत्याचा पुरावा, आधार लिंक मोबाईल नंबर, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा.

हा डीडी फक्त “Dy R.T.O. Solapur” यांच्या नावे नॅशनलाईल/शेडयुल्ड बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील.

अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ “अ”मध्ये विहीत केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल (उदा. आधार कार्ड, टेलिफोन बील इ.)

एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ५ वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी (दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत) सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सदर केलेला डीडी रूपये १००० रुपयेपेक्षा कमी रक्कमेचा नसावा. सदर डीडी फक्त “Dy R.T.O. Solapur” यांच्या नावे नॅशनलाईज/शेडयुल्ड बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा. दि. २७  डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४  वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडुन ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या तारखेपासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल, कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही. वाहन धारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डी.डी. जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही. अशी माहिती  प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी  दिली आहे.

=============================================================================

 चारचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक (MH 13 ES)

  • दि. २६ डिसेंबर २०२४ तिप्पट शुल्कचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्विकारणे. वेळ -११ ते ४
  • दि. २६ डिसेंबर २०२४ सायंकाळी ५  वाजता यादी जाहीर.
  • दि. २७ डिसेंबर २०२४ दुपारी २ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्विकारणे रूपये १००० रुपया पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे.
  • दि. २७ डिसेंबर २०२४ तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जांचा लिलाव दुपारी ४ वाजता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *