शासकीय वसतीगृहासाठी इमारत भाडे तत्वावर देणार

 शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले संपर्क साधण्याचे आवाहन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  :  शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहासाठी पंढरपूर (जि. सोलापूर) येथे  इमारत भाड्याने घ्यावयाची आहे. सदर शासकीय वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारत देण्यासाठी इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर  व गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, संभाजीराजे नगर, कोर्टी रोड, पंढरपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

सदर वसतीगृहासाठी  मुलींना शाळा, कॉलेजच्या दृष्टीने मध्यवर्ती सोयीस्कर भागात ८० विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खोल्या (३० ते ३५), भोजन हॉल, स्वयंपाकगृह, धान्य, भांडारगृह, वीज, पाणी, शौचालय (संख्या १०), प्रसाधनगृहे (संख्या १०) आदी सोयीनीयुक्त अशी कमीत कमी सर्वसाधारण ८५००चौ. फूट पक्के बांधकाम असलेली इमारत त्वरीत भाडयाने घ्यावयाची आहे. त्यामध्ये स्वतंत्र वीज व्यवस्था असावी, पिण्याच्या पाण्याची सोय असावी, वापरण्याच्या पाण्याची साठवणुकीची सोय असावी. इमारती भोवती संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमाणित दराने इमारत भाडे मंजूर केले जाईल.

सदर इमारतीचे भाडे शासन स्तरावरुन मंजूर केले जाईल. इमारत भाडयाने घेण्याबाबतचे अधिकार सहायक आयुक्त् समाजकल्याण आयुक्तालय यांना आहेत. तरी इच्छुक इमारत मालकांनी जागेची कागदपत्रे नकाशासह सात दिवसाच्या आत सहायक आयुक्त समाजकल्याण सोलापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता सोलापूर (दूरध्वनी क्रमांक-०२१७-२७३४९५०) व गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, संभाजीराजे नगर, कोर्टी रोड, पंढरपूर (दूरध्वनी क्रमांक ०२१८६-२९५८३२) यांच्याकडे तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही शासकीय वसतीगृहाचे गृहपाल  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *