लस भांडार उभारण्यात कुचराई केल्याबद्दल डॉ. पिंपळेंना बडतर्फ करा

– आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांच्याकडे छावा संघटनेची मागणी

Health Department

सोलापूर : प्रतिनिधी 

शासनाने (Government) गेल्या दिड ते दोन वर्षांर्वी प्रत्येक जिल्ह्यात लस भांडारसाठी (vaccine store) सुमारे अडीच कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील लस भांडारचा अत्याप पत्ता नाही. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना बडतर्फ करा, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांच्याकडे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी मेलव्दारे केली आहे.

            तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्हयाजवळील धारशिव या दुष्काळी जिल्ह्यात सदरचे लस भांडार पूर्णत्वाच्या दिशेने वाट चाल करीत आहे. सोलापूर जिल्ह्यात लस भांडारसाठी कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. लस भांडारसाठी लागणारी जागा अंतिम करणे हे कामही डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी केलेले नाही. डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे  सोलापूर जिल्ह्यात लस भांडार तयार होऊ शकले नाही. डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी लस भांडारासाठी कागदी घोडे नाचविणे यापलीकडे कोणतेही काम केले नाही. सदर कामासाठी जोपर्यंत त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांची इच्छा होत नाही, तोपर्यत सदर कामकाज लांबणीवर टाकण्यात डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे यांचे मनसुबे आहेत. केवळ जागेसाठी पत्रव्यवहार करून ठेवलेला आहे. ज्याना हा पत्र व्यवहार केलेला आहे, त्या सबंधित अधिकारी यांना खाजगीमध्ये भेटून जागेची तत्काळ आवश्यकता नसल्याचे डॉ. पिंपळे हे सांगतात. त्यामुळे अनेक वर्ष होऊनही सोलापूर जिल्ह्यात अद्यापी लस भांडार स्थापित झालेले नाही.

शहर-जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात लस भांडाराची अत्यंत गरज आहे. परंतु डॉ. पिंपळे यांच्याकडून यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या व शासकीय यंत्रणेचे आदेश पालन न करणाऱ्या डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे यांची  वरील तक्रारीनुसार चौकशी करण्यात यावी आणि त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांच्याकडे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *