६९  लाख ४५ हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  सोलापूर येथील विजयपूर रोड, नांदणी टोल नाका (ता.दक्षिण सोलापूर) येथे टाटा कंपनीचे १२ टायर वाहन क्र-आर.जे-११- जीसी-९११८ या वाहनाची तपासणी केली असता  त्यामध्ये २४ हजार ४९८ किलो वजनाची  रंगमिश्रीत व निकृष्ट दर्जाची  सुपारी आढळून आली. सदर मालाची  किंमत सुमारे  ६९ लाख ४५ हजार १८३  रुपये  इतकी असून, हा साठा  जप्त करण्ययात आला असल्याची माहिती रुपये सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी  दिली. सहायक आयुक्त (अन्न) सा.ए.देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी  अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन, उर्वरित २४ हजार ४९८ किलो, किंमत ६९ लाख ४५ हजार १८३ रुपयेचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई सहायक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी व अस्मिता टोणपे तसेच नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने केली असल्याचे  अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (अन्न) देसाई यांनी कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *