विविध ,चटकदार, खमंगदार पदार्थांचा पालक, विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अरुण प्राथमिक शाळा व कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत भरविण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात ५२ स्टॉल भरविण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ तयार करून उभारण्यात आलेल्या या स्टॉलच्या माध्यमातून तयार केलेल्या या पदार्थाची विकी केली. विविध ,चटकदार, खमंगदार पदार्थांचा पालक आणि विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी हा आनंद मेळावा भरविण्यात आल्याचे माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू आणि प्राथमिकचे मुख्याध्यापक मिराखोर यांनी सांगितले.
यावेळी पालक समिती सदस्य इब्राहिमपुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.