लुई ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्अंथेचा स्धतुत्य उपक्रम; मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र संघाची विजयी सलामी
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : लुई ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने अंध (दृष्टिहीन) मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र संघाने विजयी सलामी दिली आहे.
जागतिक दिव्यांग दिन-पंधरवाड्याचे औचित्य साधून, लुई ब्रेल अंध विकास, बहुद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्यावतीने अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा व शालेय अंध मुलांच्या जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धचे आयोजन सोलापुरातील रेल्वे मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अंध मुलींचे विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र हे संघ सहभागी झाले आहेत. शालेय अंध मुलांच्या स्पर्धमध्ये सोलापूर येथील भैरूरुतन दमाणी अंध शाळा व राजीव गांधी मेमोरिअल स्कुल फॉर दि ब्लांइंड हे संघ सहभागी झाले आहेत.
- स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुलींच्या पश्चिम महाराष्ट्र संघाने विदर्भ संघाचा ८१ धवांनी पराभव केला. यात गंगा कदम हिने ४५ चेंडूमध्ये १७ चौकारांच्या सहाय्याने ९९ धावा काढल्या आणि दोन गडीदेखील बाद केले. गंगा कदम ही या सामन्याची सामनावीर ठरली.
- मुलांच्या क्रिकेट सामन्यात दमाणी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी राजीव गांधी अंध शाळेचा ३९ धवांनी पराभव केला. या सामन्यात रोहीत कुंभार याने २० चेंडूत २९ धावा काढून सामनावीरचा मानकरी ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन महसुल विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास बलदवा परिवारातील नंदकिशोर बलदवा, गिरीष बलदवा, मधुसूदन बलदवा, ल्का बलदवा, संतोष भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या कार्याचे आणि स्पर्धचे आयोजन व नियोजनाचे अमृत नाटेकर यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू शेळके, आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष सूरज सोनटक्के तर सुत्रसंचलन संस्थेचे महासचिव संतोष देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी राजू शेळके (९५०३०४३२०१) यांच्याशी संपर्क साधावा.