– मुस्ती ग्रामस्थांकडून आभार व्यक्त

सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हयातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हरणी नदीवरती पुल बांधण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख डॉ. मनिष काळजे यांच्या प्रयत्नातून 7 कोटी 70 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. यामुळे मुस्ती येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले.
जिल्हयातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हरणी नदीवरती पुल मंजूर होण्याकरीता मुस्ती ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींकडे निवेदने दिली होती. या अनुषंगाने जिल्हाप्रमुख डॉ. काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यानी या नदीवरील पुलाचे गांभीर्य ओळखून सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि निधी मंजुर करून दिला.
याबद्दल मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख डॉ. मनिष काळजे यांचा सत्कार केला. तसेच पत्र देऊन अभिनंदन केले. या पत्रामध्ये सदरच्या कामासाठी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख डॉ. मनिष काळजे यांनी मुस्ती ग्रामस्थांचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली. त्यामुळे आमच्या मुस्तीगावास भेट देवून नदी पात्राची पाहणी केली व याचे गांभीर्य आपण मुख्यमंत्र्याना सांगितले. त्यामुळे हरणी नदीवरील पुलाच्या बांधकामाकरीता शासनाने ७ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर केले आहे. लवकरच या पुलाचे काम सुरु होईल व या भागातील शेतकरी, कामगार व नागरीकां प्रश्न सुटेल. त्यामुळे आपल्या या प्रयत्नाबद्दल मुस्ती ग्रामस्थांच्यावतीने आपले लाख लाख आभार, असे पत्र देत मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख डॉ. मनिष काळजे यांचा गौरव केला.