सिव्हील हॉस्पिटलचे अधिष्ठाता, सिव्हील सर्जन डॉ. संजीव ठाकूर यांचे आवाहन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अवयव दान जरूर करा, मात्र अवयव दान करण्याची वेळ येऊ देऊ नका. अर्थात आपले अवयव दान खराब होण्याची वेळ येऊ देऊ नका. आरोग्य सदृढ आणि निरोगी ठेवा, असे आवाहन सिव्हील हॉस्पिटलचे अधिष्ठाता, सिव्हील सर्जन डॉ. संजीव ठाकूर यांनी “अस्सल सोलापुरी डॉट कॉम”शी (assalsolapuri.com) बोलताना केले. डॉ. संजीव ठाकूर हे स्वतः लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन आहेत.
सिव्हील सर्जन डॉ. संजीव ठाकूर म्हणाले…
सोलापुरात मोठ्या प्रमाणावर कॉटन इंडस्ट्रीज आहेत. तंबाखूचे सेवनही मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे फुफ्फुस (लंग्स) निकामे झाले आहेत. अशा प्रकारचे आजार बरे होण्यासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अस्थमाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळतात. उभे राहून काम करणाऱ्यांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स हा आजार होतो. लेजर सर्मुजरीमुळे हा आजार बरा होऊ शकतो. व्यायाम, चांगल्या प्रकारच्या औषधाने फुफ्फुस (लंग्स) सारखे आजार बरे होऊ शकतात. सकाळी लवकर उठा. फुफ्फुस (लंग्स) सारखे आजार बरे होऊ शकतात. सकाळी लवकर उठा. फुफ्फुसाचे व्यायाम करा.पायी चालणे, पळणे अशा प्रकारचे व्यायाम करा. चांगली फळे खा. तंबाखुचे सेवन करू नका. धुम्रपान करू नका. ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. सिव्हीलमध्ये दैनदिन सुमारे १२०० रुग्णांची तपासणी केली जाते. ७५० ची बेड कॅपासिटी असतानादेखील ११०० पर्यंत ती वाढविली आहे. रोज जवळपास २५० रुग्ण येतात. तितकेच डिस्चार्जही घेतात.रोज ६०-७० शस्त्रक्रिया होत असतात. रोज १५ जणांवर डायलिसिस केले जातात. अन्जोग्राफी,अनजोप्लास्टीचीही सुविधा उपलब्ध आहे.