राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३३०० प्रकरणे निकाली

स्पेशल ड्राईव्ह :  लोक न्यायालयाची यशस्वी गाथा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनापूर्वी दि. ९ डिसेंबर २०२४ ते दि. १३ डिसेंबर २०२४  या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष मोहिमेमध्ये ४० वर्षे जुनी २,  ३० वर्षे जुनी ३,   २० वर्षे जुनी १,   १५ वर्षे जुनी २४,  १० वर्षे जुनी १२८,  ५ वर्षे जुनी ८८० व इतर अशी एकूण ३३०० प्रकरणे निकाली काढण्यात आली.

  • लोक न्यायालयाची यशस्वी गाथा-
  • लोक अदालत दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी पॅनल क्रमांक १ मध्ये एकूण ३२ प्रकरणांची यशस्वी तडजोड झाली. विशेषतः एल.ए. आर. १०३/२०२०  हे प्रकरण दि. १५ डिसेंबर २०२० रोजी दाखल होवून  जिल्हा व सत्र न्यायाधीश १ या न्यायालयात प्रलंबित होते. सदर प्रकरण हे  १.३२,९३०००/- रुपये या रक्कमेवर तडजोड झाली. सदर प्रकरणामध्ये एकूण १५ प्रतिवादी होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक हिश्यांच्या वाटणीसाठी बराच काळ प्रकरण प्रलंबित होते. सदर प्रकरण हे लोक न्यायालयाकडे सादर करण्यात आले. सदर प्रकरण हे लोक न्यायालयामध्ये तडजोड होवून सर्व प्रतिवादींनी भूसंपादन संदर्भ कमांक १०३/२०२० ची तडजोड रक्कम हे  १.३२,९३०००/- रुपये त्यांच्या सहमतीने केलेल्या हिश्यांच्या प्रमाणात विभागणी झाली.
  •  एम. पी. एस. सी. स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा तरूण व त्याच्या पत्नी मध्ये गैरसमजातून झालेल्या वादाचे रूपांतर ९ महिने एकमेकांपासून वेगळे राहण्यात झाले. परिणामी घटस्फोटापर्यंत येवून ठेपलेल्या प्रकरणात समूपदेशनाने व समोपचाराने केलेला प्रयत्नाला यश आले. यात दोघांनी त्यांच्या मुलीचे भविष्य व स्पर्धा परिक्षेकरिता लागणारे तणाव मुक्त वातावरण याचा सखोल विचार करून एकत्र येण्याचा निर्णय घेवून एकमेकांविरूद्धचे सर्व वाद व अर्ज लोक अदालत मध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.
  •  शेतकरी पती व गृहीणी असलेली पत्नी व तीन अपत्ये जे सुमारे चार वर्षांपासून किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकमेकांपासून विभक्त राहत होते. समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून त्यांच्या व त्यांच्या मूलांच्या भविष्याचा विचार रूजवील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरुद्धचे सर्व हेवेदावे लोक अदालतमध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.
  •  सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या एका उच्च  शिक्षित डॉक्टरेट प्राप्त प्राध्यापकाचे झालेले लग्न. वैचारिक मतभेदातून ते पती-पत्नी विभक्त राहिले. समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून त्यांच्या भविष्याचा विचार रूजवील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरूद्धचे सर्व अर्ज व दावे लोक अदालतमध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.
  •  ठाणे स्थित कॉपॅरिट क्षेत्रातील पती व गृहीणी असलेली पत्नी जे सुमारे एक वर्षांपासून शुल्लक कारणावरून एकमेकांपासून विभक्त राहत होते. समूपदेशानाने व समोपचाराने त्यांच्यात मनोमिलन घडवून भविष्याचा विचार रूज्वील्याने त्यांनी सारासार विचार करून एकमेकांविरुद्धचे सर्व हेवेदावे लोक अदालत मध्ये मागे घेवून एकत्र नांदण्यास गेले.

या सर्व प्रकरणांमध्ये मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी प्रमुख कौटुंबिक न्यायाधीश एस. व्ही. घारगे, जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी यांच्या प्रयत्नाला यश आले. सदर लोक अदालतीच्या सर्व यशस्वी प्रकरणांमध्ये सहभाग घेतलेल्या पक्षकारांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *