दहा जोडप्यांचे वैवाहिक संबंध सामंजस्याने पुर्नरस्थापित

सोलापूर जिल्हयामध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६४० जुन्या प्रकरणासह एकूण १९८३१ प्रकरणे सामंजस्याने निकाली

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : राष्ट्रीय लोकअदालत सोलापूर जिल्हयातील एकूण १९८३१ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण रक्कम रुपये ७१,०५,१४,६०५/- इतके मुल्य असणा-या प्रकरणांमध्ये सामजस्याने तडजोड करण्यात आली. दहा जोडप्यांचे वैवाहिक संबंध सामंजस्याने पुर्नरस्थापित करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे दि. १४ डिसेंबर २०२४  रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये चौथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश  मो. सलमान आझमी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते, जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंह रजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष  अमित आळंगे, सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सुधीर खिराडकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक राजन माने, भारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ शाखाधिकारी   अनिकेत फल्ले, विधीज्ञ  व्ही. एन. देशपांडे आणि जिल्हा न्यायालय प्रबंधक पल्लवी पैठणकर, विधीज्ञ, पक्षकार आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ४४२०१ प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व ९४५२५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी प्रलंबित ५०६२ प्रकरणांमध्ये तडजोड झाली आणि १४७६९ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीच्या पार्श्वभुमीवर निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सोलापूर मुख्यालयाच्या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश  जे. जे. मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर  आर. यु. नागरगोजे, दिवाणी न्यायाधीश, एस. ए. आर. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, पी. पी. पेठकर, दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी डी. डी. कोळपकर, न्यायदंडाधिकारी पी. व्ही. चव्हाण, न्यायदंडाधिकारी एस. पो. मर्डेकर, न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. रजपूत कुलकर्णी, न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील, न्यायदंडाधिकारी व्ही. एम. रेडकर, न्यायदंडाधिकारी व्ही. पी. कुंभार यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून लोकअभिरक्षक कार्यालयातील लोकरक्षक स्नेहल राऊत, एस. एम. झुरळे, एम. बी. सोलनकर, रेवण पाटील, जी. बी. नवले, व्ही. व्ही. कुर्ले, डी. व्ही. किणगी, एस. आर. शेंडगे आदींनी काम पाहिले.

चौथे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता पोलीस आयुक्त  एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त  विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले, उपायुक्त  आशिष लोकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनिल माने, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालय, सोलापूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *