राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची कारवाई
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : आचार संहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये एका दिवसामध्ये अवैध बनावट देशी विदेशी मद्य वाहतूक करणारे एका दिवसात पकडली बारा वाहने, १५ लाख ६३ हजार ३१३ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ढाब्यांवर मद्य प्राशन करणाऱ्यांनावर कारवाई करून २ लाखाचा दंड वसूल केला आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांची विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूरच्या भाग्यश्री पं. जाधव, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सोलापूर शहर व जिल्हयामध्ये केलेल्या कारवाईत १५ गुन्हें नोंद करण्यात आले असून, १३ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत २७०० लि. गुळमिश्रीत रसायन, ५९३ लि. हातभटटी दारु, २६.२५ ब.लि. देशी मदय, ८४.९६ विदेशी मदय, १५.६ ब.लि बिअर तसेच ७७.७६ ब.लि बनावट विदेशी मदय जप्त करण्यात आले असून बारा वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये एक चारचाकी वाहन, एक अॅटोरिक्षा व दहा मोटार सायकलसह एकूण १५,६३,३१३/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, ओ. व्ही. घाटगे, डी. एम. बामणे, पंकज कुंभार, भवड, मारुती मोहिते, दुय्यम निरीक्षक, आर. एम.कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, कुदळे, बहुधाने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इस्माईल गोडीकट, कपील स्वामी, दिनकर शिंदे, अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीराज तोग्गी, तानाजी जाधव, वाहनचालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी पार पाडली.
आचारसंहिता कालावधीमध्ये दि. १५ ऑक्टोबर २०२४ ते ते दि.८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण १८५ गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर कालावधीत ४२ वाहनासह एकूण १,००,३०,९४६/- इतका मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणा-या सहा हॉटेल सावजी (जोडभावी पेठ), हॉटेल जयभवानी (सलगरवस्ती), हॉटेल दुर्गा, हॉटेल मातोश्री (होटगी रोड), हॉटेल सावजी कोल्ड्रिंक्स (कन्ना चौक), ढाब्यांवर कारवाई करुन ब्रीथ् अॅनलायझरचा वापर करुन वैद्यकीय चाचणीनंतर सहा ढाबा मालक व मद्यपी ग्राहकांना न्यायालायासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रुपये २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये ३ हजार इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. असे एकूण रु.२ लाख ४ हजार इतक दंड जमा करुन घेण्यात आला आहे.
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतुकीविरोधात कारवाई या पुढेही सुरु राहणार आहे. अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक (१८००२३३९९९९) अथवा व्हॉटस अॅप क्रमांक (८४२२००११३३) यावर कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल. तसेच अवैध मद्याबाबतची माहिती कळवावी, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भाग्यश्री पं. जाधव, सोलापूर यांनी केले आहे.