निरूपणकार विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण

शुक्रवारपासून सकाळी ६.२५ वाजता “विवेकाची अमृतवाणी”चे आयोजन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर ते रविवार, दि. २७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटरमध्ये “विवेकाची अमृतवाणी”चे आयोजन करण्यात आले आहे.  निरूपणकार विवेक घळसासी यांच्या अमृत्वानीतून सदरचे निरूपण कार्यक्रम होणार आहे.

विवेकाची अमृतवाणी या कार्यक्रमामध्ये  पूर्णयोग, पूर्णयोग-अंतरंग साधना आणि पूर्णयोगातील गतिरोध या तीन विषयावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी हे आपल्या अमृतवाणीतून वैचारिक दिपोस्तव साजरा करीत आहेत. अशी माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली आहे . यामध्ये  पूर्णयोग, पूर्णयोगः अंतरंग साधना आणि पूर्णयोगातील गतिरोध या तीन विषयावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी हे आपल्या अमृतवाणीतून वैचारिक दिपोस्तव साजरा करीत असल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे रांनी दिली.

गेल्या १४ वर्षापासून अखंडपणे विविध विषयावर दिपावलीपूर्व बौध्दिक मेजवानी देण्याची परंपरा विवेकाच्या अमृतवाणीमधून निरूपणकार विवेकजी घळसासी करीत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्यावतीने हा वैचारिक दिपोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी पु. ना. गाडगीळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. विवेकाच्या अमृतवाणीमधून यंदाच्या वर्षी पहिल्या दिवशी पूर्णयोग, दुसर्‍या दिवशी पूर्ण योग-अंतरंग साधना, आणि तिसर्‍या दिवशी पूर्णयोगातील गतिरोध अशा तीन दिवसीय निरूपणातून वैचारिक दिपावली साजरी होणार आहे. दिवाळी पूर्वीची पहाट चांगल्रा विचाराने सुरू व्हावी, दिवाळीची सुरूवात मंगलमय वातावरणात बौध्दिक मेजवानीने विवेकाच्या अमृतवाणीमधून केली जात आहे. यापूर्वी प्रभू श्रीराम, महाबली हनुमान, श्रीकृष्ण, चाणक्य, रामायण, महाभारत यावर प्रवचन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देत सभागृहात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतून आलेल्रा प्रत्येक विषयाचे व्याख्यान ऐकून रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात. दिवाळीतील गोड फराळाचा आनंद घेण्यापूर्वी बौध्दिक विचारांची मेजवानी विवेकाची अमृतवाणी यातून मिळते.


सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी विवेक घळसासी यांचे निरूपण वेळेवर सुरू होऊन वेळेवर सकाळी ७.३० वाजता संपणार आहे. तरी या मंगलमय बौध्दिक आणि वैचारीक मेजवानी असलेल्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *