शहर मध्य विधानसभेवर भगवाच फडकणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचे कार्य चांगले आहे. आगामी काळात सच्चा शिवसैनिकांना निश्चित न्याय मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मंगळवारी (दि. १५ ऑक्टोबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन कार्य अहवाल सादर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्य अहवालावर समाधान व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयारीला लागण्याचे आदेश शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड मोठी फळी आहे. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीच्या आधारे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवाच फडकणार असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना शहर मध्यची उमेदवारी द्या. ते नक्की निवडून येतील, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पक्षाकडून सुरू असलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे कौतुक केले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
========================================================================================
यंदा शिवसैनिकालाच उमेदवारी
मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आयत्या उमेदवारामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पूर्वीपासून पक्षात काम करणाऱ्या शिवसैनिकालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळेल. त्याबद्दल निश्चिंत रहा, असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.