पालकमंत्री या नात्याने सोलापुरातील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकलो नाही, याची हळहळ

पालकमंत्री म्हणाले, मुंबईतील मराठा आरक्षणासंदर्भातील

पूर्वनियोजित बैठकीमुळे  कार्यक्रमास येऊ शकलो नाही

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : मराठा आरक्षणसंबंधी मुंबईत महत्वाची अशी बैठक पूर्वनियोजित असल्या कारणाने आपण सोलापुरातील महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमास येऊ शकलो नाही, असा संदेश पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मंगळवारी सोलापूरच्या लाडक्या बहिणींना व्हिडिओद्वारे दिला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांनी गेल्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्राच्या जनजीवनामध्ये एक प्रचंड असे आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. वेगवेगळ्या योजना तर आहेतच, पण ज्या योजनेने महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलेला दर महिन्याला माझे १५०० रुपये माझ्या अकाऊंटला येणार आणि ते मी खर्च करू शकणार, असा महिलांना   आत्मविश्वास मिळवणारी आनंददायी अशी माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना मिळाली. आतापर्यत तीन हप्ते मिळाली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पुढचे आडव्हान्स हप्ते मिळतील. अमरावती येथील पाच हजार महिला लाडकी बहिणींच्या उपस्थितीतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यास उपस्थित राहून, मंगळवारी सकाळीच मुंबईत पोहोचलोय. मुंबईमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील पूर्वनियोजित अशी बैठक असल्यामुळे  मी सोलापुरातील महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमास येऊ शकणार नाही, असे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना कळविले आहे. पालकमंत्री या नात्याने मी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही, याची मला हळहळ आहे. असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *