फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या हयुमॅनिटेरियन प्रकल्पाची पूर्वतयारी सुरु

 

चेअरपर्सन प्रा. डॉ. एन.बी.तेली ; प्रकल्पाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असणार

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

 सोलापूर : मिनीमम इनिशीअल पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईटस MISP (Minimum Initial Service of Package for SRHR) यावर्षी हयुमॅनिटेरियन हा प्रकल्प सोलापूर शाखेला देण्यात आलेला आहे. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकल्प पूर्व तयारीचे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची व्याप्ती महाराष्ट्रभर असणार आहे, अशी माहिती फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्रा. डॉ. एन.बी.तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी व आरोग्य सेवा देण्यासाठी पूर्व तयारी व प्रबोधन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, सोलापूर व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यालय यांच्यासोबत एफ.पी.ए.आय. काम करणार आहे. यासाठी सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळ, युवक मंडळ, आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्था, शासकीय व निमशासकीय आरोग्ययंत्रणा, इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आदींबरोबर सामंजस्य करार करुन त्यांना प्रजनन आरोग्य व कुटुंब कल्याणच्या सेवांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे व यासाठी विविध संस्थांचे सहकार्य मिळणार आहे.

यासाठी किमान प्रारंभिक सेवा पॅकेज ही योजना तयार करण्यात आलेली असून, त्यास मिनीमम इनिशीअल पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईटस MISP (Minimum Initial Service of Package for SRHR) असे संबोधण्यात आलेले आहे.

माहे सप्टेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पांतर्गत पत्रकार परिषद, दि. १९ सप्टेंबर रोजी अक्कलकोट तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका, समुपदेशक, आशावर्कर व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरीता आपत्ती व्यवस्थापनात मिनीमम इनिशीअल पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईटस (MISP) याविषयावर एक दिवसीय कार्यशाळा,  दि. २४ सप्टेंबर रोजी  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर, जिल्हा परिषद आरोग्यविभाग, सिव्हील सर्जन, महानगरपालिका आरोग्य विभाग, डॉ. व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सोमपा अग्निशमन विभाग, कम्युनिटी सोशल ऑर्गनायझेशन्सयांच्या प्रतिनिधीकरीता एक दिवसीय अॅडव्होकसी मिटींगचे आयोजन, दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी मिस्प कार्यशाळेत उपस्थित असणाऱ्याच सदस्यांकरिता सेक्शुअल जेंडर बेस्ड व्हायलंस व समुपदेशन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन, दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रिस्क रिडक्शन दिनानिमित्त विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी  चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

==================================================================================

  • या प्रकल्पांतर्गत MISP च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनावेळी पुढील सेवा दिल्या जाणार आहे.
  • कुटुंबनियोजन साधनांचे वाटप
  • सुरक्षित गर्भपात सेवा
  • लिंगभेद आधारित हिंसाचार समुपदेशन व सेवा
  •  लैंगिक हिंसाचार प्रतिबंध
  • गुप्तरोग व एच.आय.व्ही. संदर्भातील सेवा
  • सामान्य आरोग्य तपासणी व औषधोपचार
  • विच्छेदन
  • नको असलेली गर्भधारणा, नवजात विकृती आणि माता बाल मृत्यु रोखणे.
  • नैरामिक, मानवनिर्मित, जैविक आपत्तीमुळे जे परिणाम होतात त्यात रिखया व किशोरवयीन मुले-मुली अधिक प्रभावित व असुरक्षित होतात. आपत्तीमध्ये महिला, किशोरवयीन मुली, उपेक्षीत व दुर्लक्षित घटक (LGBTQIA) – लेस्बीयन, गे, बाय सेक्शुअल ट्रान्सजेंडर, क्युअर, इंटरसेक्स व एसेक्युअल, गरोदर महिला व स्तनदा माता, वयोवृध्द, एच.आय.व्ही. सहजीवन जगणारी बालके, महिला, पुरुष, दिव्यांग हे घटक प्रभावित होतात.
  • आपतकालीन परिस्थितीत महिलांवर बलात्कार, लैंगिक अत्याचार होतात. बालविवाह केले जातात, मानची तस्करी मोठ्या प्रमाणात होते तसेच असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण वाढण्याची भिती असते. गर्भधारणा व प्रसुती दरम्यान गुंतागुंतीचे प्रकार वाढतात. या सर्व समस्यांवर आरोग्यविषयक सेवा व समुपदेशन देण्याचे कार्य फैमिली पर्नेनिग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेकडून केले जाणार आहे.
  • अशा पध्दतीच्या संकटकालीन परिस्थितीत लैंगिक व प्रजनन आरोग्यासाठी किमान प्रारंभिक सेवा पॅकेज अर्थात मिनिमम इनिशिअल पैकेज ऑफ  सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अॅड राईटस (MISP) महत्वाची भूमिका बजावणार आहे.

============================================================================================

हा प्रकल्प महिला आरोग्य केंद्रित असला तरी अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास पुरुषांनाही त्यावेळची गरज लक्षात घेऊन आरोग्यविषयक सेवा दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात प्रबोधनात्मक कार्य केले जाल आहेत. यापूर्वी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या विविध शाखांच्यावतीने सन २०१८ मध्ये केरळामधील कोडूगू येथील महापूर, सन २०१९ मध्ये सायक्लोन फनी, सन २०२० मध्ये सायक्लोन अॅम्फान, सन २०२१ मध्ये कोरोना महामारी, सत २०२१-२२ मध्ये केरळामधील महापूर, सन २०२१-२२ मध्ये चेन्नईमधील महापूर, सन २०२३-२४ मध्ये मणीपूर दंगलीत सेवा देण्याचे काम प्रकल्पातून केले आहे. सध्या केरळमधील (तिरुअनंतपूरम) वायनाड येथील महापूर व भूस्खलन आपत्तीमध्ये प्रकल्पाचे काम सुरु आहे.

या प्रकल्पाचे उ‌द्घाटन सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, महसूल विभाग अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २१, २२ जून २०२४ रोजी या प्रकल्पांतर्गत युपीएचसी, पीएचसी, शासकीय व निमशासकीय आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका, समुपदेशक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनात मिनीमम इनिशीअल पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अॅड राईटस (MISP) याविषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ८० लोकांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षण शिबिरात सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी शक्तिसागर ढोले, सहाय्यक अधिकारी अर्चना विसोई, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, सोमपा सोलापूरच्या डॉ. राखी माने, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, सोलापूरचे चेअरमन डॉ. राजीव प्रधान, प्रसिध्द स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. मिलींद शहा, ए.आर.टी. विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा वरेरकर-चिटणीस, एफ.पी.ए.आय. सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, कार्यक्रम अधिकारी विरेंद्र परदेशी, अमरजा थिटे, अग्निशमन विभागाचे अच्युत दुधाळ आदींनी प्रशिक्षण दिले. दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी हयुमॅनीटेरियन दिनानिमित्त सोलापूर जिल्हयातील ग्रामपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी यांच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुक्यातील कमिटीच्या सदस्यांचा सहभाग होता. दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी पंढरपूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील व ए.आर.टी. विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका, समुपदेशक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरीता आपत्ती व्यवस्थापनात मिनीमम इनिशीअल पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अॅड राईटस (MISP) याविषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ३७ जणांनी सहभाग नोंदविला होता.

यावेळी  फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्रा. डॉ. एन.बी.तेली, व्हाईस चेअरपर्सन प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, फायनान्स अॅडव्हायझर  सपना चिट्टे, सदस्य डॉ. राजीव प्रधान, मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, माजी अध्यक्षा प्रा. डॉ. नभा काकडे व शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, विजया महाजन, अपेक्षा सावंत,गौरी कहाते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *