“दक्षिण” मेळाव्याच्या माध्यमातून अमर पाटील निवडणुकीचे रणसिंग फुंकणार?

अमर पाटील यांचे “अश्वमेध” रोखणे अन्य पक्षांना कठीण जाणार?

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

बसवराज मठपती / सोलापूर :

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब गट) जिल्हाप्रमुख अमर रतिकांत पाटील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  दक्षिण सोलापूर विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनीदेखील दंड धोपटला असून, दक्षिणमधून आपला विजय निश्चित असल्याचा त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीचा निर्णय हा पूर्णतःहा पक्षश्रेष्ठींचा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. अशामध्ये पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते आपणास मान्य असल्याचे सांगून त्यांनी बंडखोरीबाबतची आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. त्यामुळे दक्षिणमधून सध्यातरी अमर पाटील यांनी शिवसेनेकडून जरी उमेदवारीचा दावा केला असला तरी शिवसेनेकडून अमर पाटील यांच्याकडून बंडखोरी होणार नाही, हे त्यांनी केलेल्या विधानावरून तरी सध्या दिसून येत आहे. मात्र आगामी काळात आणि मेळाव्यानंतर खरी वस्तुस्थिती समोर येईल आणि उमेदवारीची माळ अमर पाटील यांच्या गळ्यात पडेल की नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दक्षिणसाठी  शिवसेनेसह अन्य पक्षासह अपक्ष असे अनेकजण यंदा  निवडणूक रिंगणात उभे राहतील, असेच चित्र सध्या दिसून येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब गट) यांच्यावतीने  दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांचा मेळावा येत्या गुरुवारी (दि. १२ सप्टेंबर २०२४) रोजी घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. खासदार संजय राऊत यांच्या परखड आणि रोखठोक वक्तृत्वशैली, यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेनेला आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी यांना नक्कीच उर्जा मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे नव्या जोमाने शिवसेनेचे कार्यकर्ते कामाला लागतील, यात शंका नाही. यामुळेही अनेकजण आश्वस्त झाले आहेत. अनेकांच्या आशा उंचावल्या आहेत. अनेकांना बळदेखील मिळणार आहे.

येत्या गुरुवारी होणाऱ्या  दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांच्या मेळाव्यास पाच हजारहून अधिकजण उपस्थित राहणार असल्याचे अमर पाटील यांनी सांगितले आहे. हा मेळावा अमर पाटील यांच्यासाठी कितपत पोषक ठरणार आहे, याचीही सखोलता कळणार आहे. दरम्यान, अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालायाचादेखील शुभारंभ होणार आहे. एकीकडे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि दुसरीकडे संपर्क कार्यालायाचादेखील शुभारंभ, तेही दिग्गज आणि वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शुभारंभ होणे, खरोखरच  हा अमर पाटील यांच्यासाठी दुग्धशर्करा योग ठरणार आहे. याचा उपयोग अमर पाटील हे कितपत करून घेतील? हे पाहावे लागणार आहे.

अमर पाटील यांचे वडील रतिकांत पाटील हे दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा गट, सच्चे शिवसैनिक, त्यांचे खंदे समर्थक यांची खऱ्या अर्थाने जर अमर पाटील यांना साथ मिळाली तर अमर पाटील यांच्या माध्यमातून पाटील कुटुंबातील दुसऱ्या पिढीचा अमर पाटील यांच्या माध्यमातून, रूपाने  आमदारकीची माळ नक्कीच गळ्यात पडेल, यात काही शंका नाही. अर्थात अमर पाटील यांच्या विजयाची शतप्रतिशत श्वाश्वती राहील, असेच चित्र सद्याचे दिसून येत आहे. कारण अमर पाटील यांच्या पाठीमागे मोठा युवक वर्ग आहे. आपल्या कार्यकुशल नेतृत्वातून अमर पाटील यांनी अतिशय कमी वयात दक्षिणमध्ये एक मोठा युवा समर्थक वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्यापाठीमागे मोठ्या प्रमाणावर युवकांची फळी उभी राहणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीत युवा वर्ग हा अमर पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यांचे त्यांना भरपूर समर्थन मिळणार आहे. शिवाय समाज आणि जातीनिहाय समीकरण पाहता अमर पाटील हे लिंगायत समाजाचे एक उभरते नेतृत्व दक्षिण तालुक्यातून उदयास येत आहे. त्यांच्या पाठीशी नक्कीच बहुसंख्य लिंगायत समाज यंदा उभा राहील, असेच सध्यातरी चित्र दिसून येत आहे. शिवाय शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील आणि त्यांचे खंदे समर्थक, शिवसैनिक  यांचे समर्थन अमर पाटील यांना कितपत मिळणार आहे, हेही पाहावे लागणार आहे. याशिवाय अमर पाटील हे सर्वसमाजाशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अन्य समाजाचाही त्यांना समर्थन मिळेल, असे वाटत आहे.  दक्षिण तालुक्यातील आणखी एक मोठे युवा आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व असलेले शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांना मानणारा एक मोठा वर्ग दक्षिणमध्ये आहे. शिवाय दक्षिणमधील बहुसंख्य असा कोळी समाज. त्यामुळे शरद कोळी यांची अमर पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शतप्रतीशत साथ जर मिळाली तर अमर पाटील यांचा विजयी रथ  “अश्वमेध” रोखणे अन्य पक्षांना कठीण जाणार आहे, हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *