मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : बँकेविषयी तक्रार असेल तर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद :  बँकांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात केले

असतील तर ते संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर परत येतील

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दि. १४ ऑगस्ट २०२४ पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही बँकांकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे विविध कारणास्तव परस्पर कपात केले जात आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांना संबंधित लाभार्थ्याचे बँक खात्यावरील पैसे कपात करू नये, याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लाभार्थ्यांचे बँक खात्यातून पैसे कपात झाले असतील, तसेच या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.   तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका निहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक खालील प्रमाणे देण्यात येत आहेत.

  • माढा – संरक्षण अधिकारी उज्वला कापसे (मो.नं. ८३०८२७३११४), विस्तार अधिकारी बंडू खेताडे (मो.नं. ७०३०३८४७११), विस्तार अधिकारी आकाश कोकाटे (मो.नं. ७०३०३८४७११)
  • बार्शी – विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले (मो.नं. ८२०८२१३९२१), विस्तार अधिकारी सुरज काटकर (मो.नं. ८२०८२१३९२१)
  • उत्तर सोलापूर- संरक्षण अधिकारी अविनाश जेठीयार (मो.नं. ८६९८४७५८०८), विस्तार अधिकारी रवी पाटील (मो.नं. ७५८८०४६२५९)
  • मोहोळ – संरक्षण अधिकारी उज्वला कापसे (मो.नं.८३०८२७३११४), विस्तार अधिकारी शिलादेवी दाढे (मो.नं. ९९७५५६७७३२)
  • सांगोला- संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण (मो.नं. ७८७५६९३२४१), विस्तार अधिकारी प्रविण गायकवाड (मो.नं. ८४२१९१०९२८),
  • करमाळा – संरक्षण अधिकारी मिथुन पवार (मो.नं. ९५२७३४११४७), विस्तार अधिकारी संदिप रणदिवे (मो.नं. ७३८७२९४३८३)
  • माळशिरस – संरक्षण अधिकारी पी.एस.वावरे (मो.नं. ८७८८१५८२३०), विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे (मो.नं. ९६३७९८३७३९)
  • पंढरपूर – विस्तार अधिकारी अनंत शिंदे (मो.नं. ९०४९५२९७९७), विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार (मो.नं. ८२७५३०३१७३)
  • दक्षिण सोलापूर – विस्तार अधिकारी ऋषीकेश जाधव (मो.नं. ८६००७९८८९९), संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे (मो.नं. ९०४९११३२८२)
  • अक्कलकोट – विस्तार अधिकारी मृणाली शिंदे (मो.नं. ९४२०३५८३५५), संरक्षण अधिकारी एस.एस.कलशेट्टी (मो.नं. ९६६५६७३७४५)
  • मंगळवेढा – पर्यवेक्षिका अनुराधा शिंदे (मो.नं. ९४२३५९१०४९), संरक्षण अधिकारी आर.आय.विजापूर (मो.नं. ९३२६५२७०४४).
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *