एमआयटी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी प्रा. स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस साजरा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : एमआयटी ज्युनियर कॉलेज, सोलापूर यांच्यावतीने एमआयटी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी प्रा. स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित कॉलेजच्यावतीने मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशन येथे सर्व लाभार्थींना खाऊ वाटप करण्यात आला.
प्रास्ताविक वंदना कोपकर यांनी केले. प्रार्थना फाउंडेशनची स्थापना आणि त्याची वाटचाल संस्थेचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी मुलांना आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी एकाग्रता आणि अपार कष्ट याची सांगड घालण्याचे आव्हान केले. अध्यक्षीय समारोप कॉलेजचे प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी केली. याप्रसंगी बोलताना प्राचार्य गायकवाड यांनी प्रसाद मोहिते यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना सदैव मदतीसाठी तत्पर राहू असे आश्वासन दिले. याप्रसंगी. पर्यवेक्षक श्यामसुंदर माने, डॉ. गजधाने, सावळे यांच्यासह अकरावी, बारावी कॉमर्सचे विद्यार्थी उपस्थित होते.