नराचा नारायण होण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती

प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद,

धर्मराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : यज्ञ हे ईश्वराचे रूप आहे. ईश्वर प्राप्तीसाठी नराचा नारायण होण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती आहे, असे प्रतिपादन साधना सदन आश्रम हरिद्वार येथील प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी यांनी केले. श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे शुक्रवारी प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी यांच्यासह देशभरातील विविध प्रांतातील साधूसंतांचा सन्मान करण्यात आला.

मठातर्फे सुरू असलेल्या अतिरुद्र स्वाहाकाराचे दर्शन देशभरातील विविध प्रांतातील नीसाधूसंतांनी घेतले. यावेळी रुद्रयंत्र, नेपाळहून आलेली रुद्राक्षाची माळ, शाल आणि पुष्पहार घालून सर्वांचा मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री कुंदुर मठ म्हैसूर येथील प. पू. नि. प्र. स्व. डॉ. श्री. शरदचंद्र महास्वामीजी, श्री सालरू बृहन्मठ मले महादेश्वर बेट्ट येथील प. पू. शांतमल्लिकार्जुन महास्वामीजी, श्री नीलकंठ मठ म्हैसूर येथील प. पू. म. नि. प्र. श्री सिद्धमल्ल महास्वामीजी, विरक्त मठ मुडीगुंड येथील प. पू. म. नि. प्र. श्री. श्रीकंठ महास्वामीजी, पट्टदमठ दंडीकेरे येथील प. पू. श्रो. ब्र. श्री. बसवलिंग महास्वामीजी, स्वामीअमृतानंद पुरी, मल्याळस्वामी आश्रमाचे प. पू. ब्रम्हविद्यानंद गिरी, मठाधिपती श्री. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, प. पू. श्री. ब्र. श्री. जडेसिद्धेश्वर महास्वामीजी, कर्नाटकातील परमानंदवाडी येथील प. पू. अभिनव ब्रह्मानंद महास्वामीजी, सिद्धारूढ स्वामी हिप्परगी, प्रधान आचार्य पंडित गोविंद शास्त्री जोशी, प. पू. अजेय चैतन्य महास्वामी, प. पू. नागभूषण शास्त्री, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, दैनिक पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, छ्त्रपती शिवाजी महाराज क्रिएटिव्ह सोल्यूशनचे विकास देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गिरीश गोसकी यांनी केले. मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी आभार प्रदर्शन केले.

============================================================================================

प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी म्हणाले, भगवंताची नावे अनेक आहेत. परंतु परमात्मा एकच आहे. तो वेगवेगळ्या रूपात वेगवेगळी कामे करत आहे. हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याचे अज्ञानापोटी बोलले जाते. परंतु कोटी याचा अर्थ प्रकार असा आहे. त्यामुळे हिंदू धर्मात ३३ प्रकारचे देव आहेत. यज्ञ म्हणजे तन, मन, धन, श्रद्धा, भावना, देवाला समर्पित करणे होय. यज्ञामुळे जगाचे अस्तित्व आहे असे श्रीमद् भगवद्गीतेत सांगितले आहे. यज्ञ मानवाचे अंतकरण शुद्ध करतो, असेही प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *