महाराष्ट्र-विदर्भ सराव सामन्याला सुरुवात

सिद्धेश वीर

सिद्धेश वीर, सचिन धस यांची अर्धशतकीय खेळी

by assal solapuri ||

सोलापूर : इंदिरा गांधी स्टेडियमवर शनिवार, दि. २४ ऑगस्टपासून महाराष्ट्र आणि विदर्भ या संघांमध्ये तीन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याला सुरुवात झाली.

महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीला आलेल्या मुर्तुजा ट्रंकवाला व सिद्धेश वीर यांनी डावाची सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. परंतु सातव्या षटकात मुर्तुजा ट्रंकवाला (१ धावा) याला दर्शन नालखंडे याने मंदार महाले याच्या सहाय्याने झेलबाद करत परत पाठवले. त्यानंतर आलेल्या सचिन धस आणि सिद्धेश वीर यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची भागीदारी केली. हर्ष दुबे याने सिद्धेश वीर (५७ धावा) याचा डाव संपुष्टात आणला.

image source    सचिन धस

त्या पाठोपाठ सचिन धस (५४ धावा) हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्यानंतर यश क्षीरसागर (नाबाद १२ धावा) आणि मंदार भंडारी (नाबाद १७ धावा) करत डाव सावरला. शनिवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा महाराष्ट्र संघाची धावसंख्या ३९ षटकात ३ बाद १५३ धावा अशी झाली आहे. दर्भ संघाकडून हर्ष दुबे याने २ बळी  आणि दर्शन नालखंडे याने १ बळी टिपला.

पंच म्हणून बीसीसीआई पंच अनिश सहस्रबुद्धे गणेश चऱ्हाटे हे काम पाहत आहेत. तर गूनलेखक म्हणून प्रसाद शावंतूल हे काम पाहत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *