image source
मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन
by assal solapuri ||
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये पुन्हा सुधारीत केलेला आहे. मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि. २४ व २५ ऑगस्ट २०२४ रोजी २४८ सोलापूर शहर उत्तर व २४९ शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व बिएलो हे बीएलए यांच्यासोबत यादीभागातील परिसरात सर्व्हे करुन नवीन मतदार नोंदणी व मयत दुबार स्थलांतरीत मतदार वगळणी करणार आहेत. मतदार नोंदणीसाठी नमुना ६ आवश्यक कागदपत्राचा तपशीलाप्रमाणे भरावेत.
============================================================================================
मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरण्यासाठी आवश्यक कागदपत्राचा तपशील खालील प्रमाणे..
मतदाराचा पासपोर्ट आकारातील फोटो (फोटोच्या मागील बाजूस व्हाईट बॅकग्राऊड असावे) व मतदाराचे जन्म तारखेचा पुरावा यामध्ये खालीलपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे.
१) जन्म दाखला २) आधारकार्ड ३) पॅन कार्ड ४) ड्रायव्हिंग लायसन्स ५) पासपोर्ट ६) दहावी, बारावी बोर्ड सर्टीफिकेट, ज्यावर जन्म तारीख नमूद असावी. ७) जन्म तारीख नमूद असलेला अन्य कोणताही पुरावा.
———————————————————————————————————————————————————–
रहिवासाचा पुरावा यामध्ये खालीलपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे.
१) बैंक / किसान / पोस्ट ऑफिस करंट पासबुक २) रेशन कार्ड ३) पासपोर्ट ४) ड्रायव्हिंग लायसन्स ५) इनकम टैक्स असेसमेंट ऑर्डर ६) भाडे करारनामा ७) पाणी / दूरध्वनी/ लाईट / गैस कनेक्शन बिल ८) अर्जदाराचे नांवे पोस्ट विभागामार्फत पोहोच झालेले कोणतेही पत्ता नमूद केलेले कागदपत्र.
———————————————————————————————————————————————————–
मयत, स्थलांतरीत मतदारांचे वगळणीसाठी त्यांनी अथवा त्यांचे रक्तसंबंधातील नातेवाईकांनी नमुना ७ चे अर्ज भरुन सादर करावेत. तसेच मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना ८ मधील अर्ज व ज्या बाबीची दुरुस्ती करावयाची आहे त्या संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. तरी नागरीकांनी विशेष शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.१ सदाशीव पडदुणे, व मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी केले आहे.