अंधार अन दप्तर दिरंगाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या त्रस्त नागरिकांचे येत्या मंगळवारपासून बेमुदत उपोषण

सोलापूर : महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे यांना बेमुदत उपोषण आंदोलनाची पुर्व सुचना तथा निवेदन सुपूर्द करताना हेरिटेज मणिधारी प्लॉटधारक संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी, रहिवासी. सोबत नगर अभियंता अकोलकर दिसत आहेत.

हेरिटेज मणिधारी सोसायटीच्या रहिवाश्यांनी नगर अभियंतासमोर मधल्या गाऱ्हाणी;

संयुक्त कृती समितीचा तीव्र आंदोलनाचा निर्णय

by assal solapuri ||

सोलापूर :  अक्कलकोट रोड स्थित हेरिटेज मणिधारी सोसायटीचे रहिवाशी अंधार अन दप्तर दिरंगाईच्या दुष्टचक्रात अडकल्याने  ते त्रस्त झाले असून,  येत्या मंगळवार, दि. २७ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी  नगर अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध समस्या, तक्रारींचे गाऱ्हाणे मांडणारे निवेदने सादर केले.

या निवेदनातील नमूद आशय असा की,  हेरिटेज मणिधारी सोसायटीचे हस्तांतरण महापालिकेला करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विकासकांनी दि. ५ सप्टेंबर २३ रोजी सादर केला. तो वर्षभर रखडत ठेवला गेला. दरम्यान, हस्तांतराचे कारण पुढे करून विकासकांनी संकुलातील पथदिवे तीन महिन्यापासून बंद करून ठेवली आहेत. त्या संबंधीचे गाऱ्हाणे निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटी देऊन मांडल्या. नगर अभियंता यांना संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचारी यांना वारंवार भेटून त्यांना येथील अडीअडचणी, तक्रारी मांडण्यात आल्या. आयुक्तांच्या रजेच्या काळात उपायुक्त घोलप यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले गेले. स्वतः  आयुक्तांसोबतदेखील तीनवेळा भेट- चर्चा झाली आहे. परंतु हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ स्थितीतच असल्याने प्लाॅटधारकांत असंतोष पसरला आहे. देशाचे ‘स्वातंत्र्यदिन’ अंधारात, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमासारखे सण अंधारात काढणार्‍या नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. त्यामुळेच आता संयुक्त कृती समितीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

====================================================================================
संकुलातील स्ट्रीट लाईट सुरु होण्याकामी येत्या दि. २६ तारखेपर्यंत आदेश व्हावेत. अन्यथा नाईलाजास्तव पालिका आवारात हेरिटेज मणिधारी प्लॉटधारक संयुक्त कृती समितीने मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ पासून उपोषणाचा निर्धार केला आहे. अर्थात त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, याची कृपया नोंद घ्यावी असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *