सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी

सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाच्या  विविध स्पर्धेत

सहभागी मंडळांचा पारितोषिक देऊन गौरव करणार

 by assal solapuri ||

सोलापूर : सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाच्यावतीने सन २०२३-२४ या कालावधीत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भाग घेतलेल्या मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय येथे होणार होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळ उत्सव समितीच्या अध्यक्षा लताताई फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी सादर केलेल्या आरास, लेझीम, ढोल पथक, झांज पथकांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या बक्षीस वितरण समारंभास खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, ज्येष्ठ नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, दिलीप कोल्हे, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळाच्यावतीने सन २०२३-२४ या कालावधीत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सन २०२३ साली श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ३५० महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती. तसेच ३५० ढोल-ताश्यांनी मानवंदना देण्यात आली. यासह रक्तदान, आरोग्य  शिबीर, सौरउर्जा जागरूकता, पर्यावरण रक्षण, पारंपारिक देशी खेळ स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ढोल-ताशा पथक स्पर्धा, सेंद्रिय शेती उपक्रम, शेतकऱ्यांना बियाणे वाटप, गड-किल्ला संवर्धन असे अनेक उप्रकम घेण्यात आले. विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबवून गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये सहभागी मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, विश्वस्त दिलिप कोल्हे, दास शेळके ,सुनील रसाळे, संजय शिंदे, श्रीशैल बनशेट्टी, हेमाताई चिंचोळकर, विजय पुकाळे, गौरव जक्कापुरे, नंदकुमार उपाध्ये, सोमनाथ मेंडके यांची उपस्थिती होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *