किसान नगरातील महादेव मंदिरात कळसारोहण
by assal solapuri ||
सोलापूर : किसान नगरातील श्री महादेव मंदिरात शिवलिंग नंदी प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साही आणि भक्तीमय वातावणात पार पडला. हा सोहळा माजी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राजू हौशेट्टी, राकेश बागदुरे, मनोज कलशेट्टी, प्रभाकर गंपले, पांडुरंग रंगदळ, बाळासाहेब आमले, अण्णाप्पा माळी, सिद्धाराम प्याटी, संतोष क्षीरसागर, संतोष साळुंखे, अमोल वाघमोडे आदी भक्तगण उपस्थित होते.

