समाधान प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते ध्वजारोहण

by assal solapuri||

सोलापूर : नूर-ए-मदिना ट्रस्ट व महात्मा बसवेश्वर सामाजिक  संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यदिनानानिमित्त समाधान प्राथमिक मराठी विघालयातील ३५० विद्यार्थ्यांना माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी इम्तियाज यादगीर यांनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प जाहीर केला.

याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, मल्लिनाथ याळगी, इम्तियाज यादगीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास सैपन शेख, रुकुम पटेल, डॉ. बोरगांवकर, रसुल चौधरी, सलीम शेख, महमद शेख, वकील गिलकी, महादेव व्हनमाने, धानप्पा याळगी, विठ्ठल कोळी, भीमाशंकर मुकसाने, महिला व समाधाननगरमधील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *