प्रिसिजनला टोयोटाचा नामांकित झिरो डिफेक्ट सप्लाईज ऑफ द ईयर पुरस्कार

सन २०२३ मधील व्यवसायिक कामगिरीसाठी सन्मान

by assal solapuri||

 सोलापूर :  प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड या कंपनीला  सन २०२३ मधील  व्यावसायिक मगिरीसाठी टोयोटा मोटर्स कंपनीकडून व्यावसायिक क्षेत्रातील नामांकित असणारा  “झिरो डिफेक्ट सप्लाईज” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रिसिजनने टोयोटा मोटर्सला संपूर्ण सन २०२३ या कॅलेंडर वर्षात पुरवठा केलेल्या कॅमशाफ्टमध्ये एकही डिफेक्ट नव्हता. संपूर्ण वर्षात पुरवठा केलेल्या कॅमशाफ्टमध्ये एकही चूक नव्हती. टोयोटासारख्या गुणवत्तेचा आग्रह धरणाऱ्या ग्राहकाकडून हा नामांकित पुरस्कार मिळणं हीच मोठी उपलब्धी आहे. त्याबद्दल चेअरमन यतिन शहा यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

पुरवठ्यातील सातत्यपूर्ण गुणवत्ता, स्पर्धात्मक किंमत, शून्य अपघात, पुरवठ्यातील शून्य चुका आणि ऑडिटमध्ये एकही चुकीचं निरिक्षण नाही या सर्व निकषांवर हा पुरस्कार दिला जातो.असा पुरस्कार मिळवणारी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स ही एकमेव पुरवठादार कंपनी ठरली आहे. मागील वर्षात प्रिसिजनने टोयोटा मोटर्स कंपनीला कोणत्याही दोषाशिवाय १ लाख ७० हजार कॅमशाफ्टचा पुरवठा केला आहे. मागील सलग तीन वर्षांपासून टोयोटा समूहाचे झिरो डिफेक्ट व बेस्ट क्वालिटी अवॉर्ड प्रिसिजन कंपनीस मिळत आहेत.


प्रिसिजनने मागील ३० वर्षापासून सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कस्टमर फोकस कामातील अचूकपणा हीच आपली ओळख बनविली आहे. पॅसेंजर कारच्या कॅमशाफ्ट उत्पादनातील अग्रगण्य उत्पादन कंपनी म्हणून प्रिसिजनची जगात ओळख निर्माण झाली आहे. टोयोटा मोटर्स सारख्या जगविख्यात उद्योग समुहाकडून हा पुरस्कार मिळणे हा फक्त प्रिसिजनचा नाही तर सोलापुरच्या कुशल कामगारांचा बहुमान असल्याची भावना प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा यांनी व्यक्त केली आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी बंगळूरू येथे पार पडलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्यावतीने कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर चंद्रशेखर सिंह व सेल्स मॅनेजर शशिकांत रेड्डी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *