“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा पुण्यात  राज्यस्तरीय शुभारंभ

सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात थेट प्रक्षेपण  

by assal solapuri||

सोलापूर  : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ शनिवार, दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ ते ४ यावेळेत शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले व निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री, सहकार, नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर रूक्मिणी किसन मोहोळ, उपमुख्यमंत्री तथा मंत्री, गृह, विधी न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मंत्री, वित्त व नियोजन, मंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.

                                                                                                                        image source

हा कार्यक्रम पुणे बालेवाडी येथे होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात पाहता येणार आहे. हा कार्यक्रम दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजनेचे किमान ७००ते ८०० लाभार्थी उपस्थित राहणार आहेत.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *