दोन महिन्यानंतर निवृत्ती असताना थडसरेंचा तडकाफडकी राजीनामा

Thadsare’s hasty resignation

दोन महिन्यानंतर निवृत्ती असताना थडसरेंचा तडकाफडकी राजीनामा

  • महापालिकेत बनला चर्चेचा विषय

सोलापूर : प्रतिनिधी
दोन महिन्यानंतर निवृत्ती असताना महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अधिकारी प्रदीप थडसरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिकेत चर्चेचा विषय झाला आहे.
     आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या आरोग्य विभागात खाते प्रमुख म्हणून प्रदीप थडसरे हे काम पाहत असताना त्यांची अतिक्रमण प्रतिबंधक अधिकारी म्हणून सप्टेंबर 2022 मध्ये बदली करण्यात आली. आतापर्यंत साधारणतः 6 महिने त्यांनी या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचा कार्यभार सांभाळला आहे. मात्र अचानकपणे थडसरे यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे महापालिका वर्तुळात याबद्दल वेगळीच चर्चा सुरू आहे.
     थडसरे हे दोन महिन्यानंतर आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी शेवटच्या टप्प्यातच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी प्रशासनाकडे सादर केला आहे. त्याची प्रक्रियाही सुरू आहे. यापूर्वी त्यांनी कर संकलन विभाग प्रमुख म्हणूनही आपल्या पदाची चांगली कामगिरी बजावली आहे. दरम्यान, महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक अधिकारीपदी लवकरच नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. या संदर्भात हालचालीही सुरू आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *