“जिओ ओर जिने दो” पाक्षिकाचे २५ व्या वर्षांत पदार्पण ; “हमारी सियासी पहचान” या पुस्तकाचे शनिवारी  प्रकाशन करणार

“जिओ ओर जिने दो” पाक्षिकाचे २५ व्या वर्षांत पदार्पण ;

“हमारी सियासी पहचान” या पुस्तकाचे शनिवारी  प्रकाशन करणार

By asslal solapuri ।।

सोलापूर : मुस्लिम ओबीसी समाजाचे मुखपत्र “जिओ ओर जिने दो” या पाक्षिकाचे २५ व्या वर्षांत पदार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर “पाक्षिक जिओ और जिने दो”ची पंचवीस वर्षाची वाटचाल संस्मरणीय बनवण्यासाठी “हमारी सियासी पहचान” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात समाजातील विविध मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कार, फकरे मिल्लतया पुरस्कार, “जिओ ओर जिने दो” मित्र पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती हसीब नदाफ आणि इरफान एस. एन. यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदरचा कार्यक्रम शनिवार, दि.३ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०. ३० वाजटा डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे होणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार आडम मास्तर, डॉ. श्रीमंत कोकाटे, डॉ.करीम सालार, बेगम आबेदा ईनामदार, हाजी इलियास सेठ, हाजी सय्यद सलीम शेठ, हाजी अ.जब्बार सेठ, हाजी नासीर अहमद खलिफा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना “फकरे मिल्लतया” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. “जिओ और जिने दो” मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अझहर हुसेन, माजी पोलीस उपायुक्त इसहाक बागवान, इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार युसूफ अब्राहानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वक्फ बोर्डाचे चेअरमन डॉ. वजाहत मिर्झा हे राहणार आहेत.


  • महाराष्ट्र राज्यात १९९३ साली मुस्लिम ओबीसी चळवळ सुरू झाली. या चळवळीने प्रथमच मुस्लिम समाजाचे शैक्षणिक आणि राजकीय प्रतिनिधित्वाचे प्रश्न ऐएणीवर आणले. याच चळवळीने राज्यात मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या जमाती, बिरादरी यांना संघटीत करुन त्यांच्या विकासाचे प्रश्न अधोरेखित केले. या चळवळीला कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद रहावा व मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रश्नावर संघटीत व्हावे, या उदात्त हेतूने ईरफान एस. एन यांनी पंचवीस वर्षापूर्वी “जिओ ओर जिने दो” या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले. मुस्लीम ओबीसीचे मुखपत्र २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

“पाक्षिक जिओ और जिने दो”ची पंचवीस वर्षाची वाटचाल संस्मरणीय बनवण्यासाठी “हमारी सियासी पहचान” या पुस्तकाचे देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेमध्ये असलेले मुस्लिम, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत राज्यातील ३६ जिल्ह्यातील मुस्लिम सदस्यांची माहिती या पुस्तकातसमाविष्ट करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस हसीब नदाफ, आसिफ इक्बाल, सय्यद गुफरान आदी उपस्थित होते .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *