
सोलापूर : प्रतिनिधी
भीमा-सीना जोड कालवा, बंधारे दुरुस्ती, कालवा स्वच्छता, प्रस्तावीत वडापूर बॅरेजसह अन्य ठिकाणचे बॅरेज, संरक्षक भिंती व घाट बांधणे, होटगी तलाव व कुडल संगम आदी पर्यटन स्थळांचा विकास त्वरित करा, अशा आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांनी जपसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दक्षिण सोलपूर मतदारसंघातील सिंचन कामे, पर्यटन स्थळे व तिर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक जपसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमेवत आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या. तसेच दक्षिण सोलपूर मतदारसंघातील भीमा व सीना नदीवर बांधण्यात आलेले को. प. बंधारे दगडी बांधकामातील आहेत. याच्या पायातून गळती होत असल्याने 34-80 स्तंभांची कामे नव्याने काँक्रीटमध्ये करण्याची मग्नक शासनाकडे केली असून त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, पाणी अडविण्यासाठी वापरात असलेले लोखंडी बर्गे गंजून खराब झाले आहेत. त्यासाठी लोखंडी बर्गे नविन पुरवठा संदर्भात आढावा घेऊन त्वरीत पुरवठा करावा, दोन्ही नद्यांच्या घाट व संरक्षक पुरसंरक्षक भिंती बांधण्याच्या सूचना आ. सुभाष देशमुख यांनी जपसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.