शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सोलापूर शहर मध्य विधानसभेचे निरीक्षक

शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सोलापूर शहर मध्य विधानसभेचे निरीक्षक

पहिल्या टप्प्यात एकूण ११३ विधानसभा मतदारसंघात ४६ निवडणूक प्रभारी, ९३विधानसभा निरीक्षक नियुक्त

By assal solapuri ।।
सोलापूर : आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून, त्यांची सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचावतीने पहिल्या टप्प्यात एकूण ११३ विधानसभा मतदारसंघात ४६ “निवडणूक प्रभारी” आणि ९३ “विधानसभा निरिक्षक” या पदांवर अधिकृतरित्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, सोलापूर शहर मध्यसाठी निवडणूक प्रभारी म्हणून विजय चौगुले यांची तर सोलापूर शहर मध्य विधानसभा निरीक्षक म्हणून प्रा. ज्योती वाघमारे यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या राज्यातील ११३ विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील केवळ दोनच मतदार संघ घेण्यात आल्याचे दिसत आहे, अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने शहर मध्यसाठी निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. मोची समाजातील नेत्या प्रा. ज्योती वाघमारे यांच्यावर मध्यची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्योती वाघमारे यांनी मध्य मध्ये चांगले काम केल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *