महेश गादेकर यांची सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

महेश गादेकर यांची सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

क्रीडा फेडरेशन खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील किरण चौगुले यांनी केली नूतन कार्यकारिणी जाहीर

By assal solapuri ।।
सोलापूर: आगामी काळात क्रीडा फेडरेशनला दिशा देण्यासाठी विविध धोरणात्मक कार्य करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील एकूण योगदान आणि मान्यताप्राप्त खेळांना चालना देण्याच्या उद्देशाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते, खो-खो आणि फुटबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गादेकर यांची सोलापूर शहर व जिल्हा फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आल्याचे प्रा. डॉ. किरण चौगुले यांनी सांगितले. तसेच वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे (महाराष्ट्र राज्य) सचिव प्रा.डॉ. किरण चौगुले यांची सचिवपदी निवड झाली आहे.

By assal solapuri ।।
सोलापूर: सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याप्रसंगी प्रा. डॉ. किरण चौगुले, चंद्रकांत रेम्बर्सू,प्रिया पवार, आनंद चव्हाण, प्रशांत बाबर, राजेंद्र माने आदी.

उपाध्यक्ष म्हणून राजीव देसाई, झुबीन अमारिया, प्रकाश काटुळे, प्रिया पवार यांची निवड झाली. सहसचिवपदी सुदेश मालप, चंद्रकांत रेम्बर्सू, प्रा. अनिल पाटील, भरत मेकाले यांची निवड झाली. खजिनदारपदी प्रा.डॉ. आनंद चव्हाण यांची निवड झाली. एम.शफी, मदन गायकवाड, रामचंद्र दत्तू, स्नेहल पेंडसे, जितेंद्र राठी, राजेंद्र माने, झेड.एम. पुणेकर, उदय डोके, संतोष खेंडे, सचिन गाडेकर यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली. जिल्हा क्रीडाधिकारी, महापालिका क्रीडाधिकारी, विद्यापीठ क्रीडा संचालक हे निमंत्रित सदस्य असतील. श्रीकांत ढेपे, दशरथ गुरव, रवींद्र चव्हाण, सचिन गायकवाड, राजेंद्र गोटे, भीमराव बाळगे, प्रशांत बाबर हे विशेष निमंत्रित सदस्य असतील. सल्लागार म्हणून प्रा. डॉ. पूरणचंद्र पुंजाल, के.डी. पाटील, हाजीमलंग नदाफ, के.टी. पवार, मरगू जाधव यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्या अडी-अडचणी सोडवणे तसेच सर्व संघटनांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी क्रीडा फेडरेशन सातत्याने प्रयत्न करीत राहील, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष महेश गादेकर यांनी दिली आहे.
सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशन विविध अशा ४८ मान्यताप्राप्त खेळांच्या विकास आणि उन्नतीसाठी त्या खेळांना चालना-प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आणि कटिबद्ध राहील, अशी ग्वाही देत प्रा. डॉ. किरण चौगुले यांनी क्रीडा फेडरेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्याचे पत्रकार सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *