रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याने वाचविले महिलेचे प्राण; रेल्वे विद्युत कर्षण(टीआरडी) कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे वाचवले प्राण; अनाहूत प्रसंग टळला

रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याने वाचविले महिलेचे प्राण;
रेल्वे विद्युत कर्षण(टीआरडी) कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे, एका महिलेचे वाचवले प्राण अनाहूत प्रसंग टळला

By assal solapuri ||
सोलापूर : रेल्वे विभागातील, रेल्वे विद्युत कर्षण (टीआरडी) कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे, एका महिलेचे वाचवले प्राण आहेत.

या घटनेची हकीकत अशी की, दि. २५ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सोलापूर रेल्वे विभागातील, रेल्वे विद्युत कर्षण (टिआरडी) कर्मचारी विकास ढेपे आणि पुरुषोत्तम वाल्मिकी हे सोलापूर- टिकेकरवाडी येथे कंबर तलावाजवळील ओव्हरहेड उपकरणांच्या नियमित देखभालीच्या (OHE) ड्युटीवर असताना त्यांनी एका साधारणपणे ५०-६० वर्ष वयोगटातील एका महिलेला रेल्वे ट्रॅकवर पडलेले पाहिले. त्यांना सदरची पिडित महिला आत्महत्येच्या हेतूने तेथे आली असल्याचे समजले. सुरुवातीला महिलेच्या कोणत्याही प्रतिकाराला न जुमानता त्यांनी तत्काळ त्या महिलेला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला केले आणि महिलेची विचारपूस केली. महिलेशी केलेल्या संवादात सदरची महिला मानसिक त्रासातून जात असल्याचे त्यांना कळले आणि त्याचमुळे ती आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर आल्याचे सांगितले .
तत्काळ त्यांनी सदरच्या पिडित महिलेविषयी आरपीएफ/कंन्ट्रोलला कळवले. तसेच आरपीएफचे कर्मचारी येईपर्यंत टिआरडी कर्मचारी ढेपे आणि वाल्मिकी यांनी पिडित महिलेच्या सुरक्षेची काळजी घेतली आणि आपण निवडेला मार्ग हा चुकीचा आहे, हे समजून सांगितले. सदरच्या पिडीत महिलेला आरपीएफच्या स्वाधीन केले.

रेल्वे कर्मचारी ढेपे आणि वाल्मिकी यांनी आपल्या कर्तव्यावर स्थित असताना आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवित रेल्वेच्या आवारात एखाद्या घटनेतून होणारी जिवीतहानीला टाळले. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे एका महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले गेले आणि तिचा जीव वाचला.
त्याबद्दल ढेपे आणी वाल्मिकी यांचे सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांच्यावतीने कौतुक केले जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *