सोलापूर शहर, परिसरात संततधार पाऊस
By assal solapuri||
सोलापूर : सोलापूर शहर व परीसरात शनिवारी (दि.२० जुलै २०२४) रोजी सकाळपासूनच संततधार पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यानंतर शनिवारी दिवसभर पावसाची संततधार रिपरिप सुरु होती. पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावण्याने सर्वाना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्गाना दिलासादायक आहे.मृग नक्षत्राच्या पावसानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने शनिवारी पुनश्चः हजेरी लावली. दिवसभर पाऊस सुरु होता मात्र पावसाचा जोर मात्र कमी होता.
कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झाला असून, संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर असल्याचा हवामान खात्याचा वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार आहे.