INDIA Meeting | इंडिया आघाडीची मुंबईतील दोन दिवसीय बैठक आज संपन्न झाली. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये या आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही भाषण केलं. यावेळी त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना एक आवाहन देखील केलं आहे की, ‘मोदींना चंद्रावर नाही, सूर्यावर पाठवा.’
लालू प्रसाद यादव म्हणाले, चांद्रयान-3 मोहिमेच्या यशासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन. “या वैज्ञानिकांचा देशभरात गौरव होत आहे. व्हायलाही हवा. आम्ही इस्रोच्या वैज्ञानिकांना एक आवाहन करत आहे. त्यांनी मोदींना मागे न ठेवता, चंद्रावरच नव्हे तर सूर्यावरही पोहोचवलं पाहिजे.” असं यादव म्हणाले.
INDIA Meeting मध्ये बोलताना ते म्हणाले, “यानंतर मोदींचं जगभरात नाव होईल. अमेरिका वगैरे सर्व देश आपल्या मागे पडतील. राहुल गांधी कित्येक देशांमध्ये फिरत असतात. तेदेखील पाहतील की मोदीजी कशा प्रकारे अमेरिकेत आणि जगभरात भारताचं नाव मोठं करत आहेत.” INDIA Meeting