India Alliance | ‘इंडिया’ आघाडीत पंतप्रधानपदाचे हे 6 संभाव्य दावेदार

India Alliance

Image Source 

India Alliance | “पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. प्रश्न हा आहे की भाजपकडे दुसरा काय पर्याय आहे?” इंडिया आघाडी बैठकीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? इंडिया आघाडीसाठी 28 पक्ष एकत्र आले परंतु अद्याप पंतप्रधान पदासाठी नेतृत्त्व ठरवता आलं नाही, अशी त्यांच्यावर भाजपकडून केली जाते. या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी “आमच्याकडे खूप पर्याय आहेत, त्यांच्याकडे काय पर्याय आहे?” असा प्रतिप्रश्न केला. India Alliance

ते म्हणाले, “जे दहा वर्षांपासून आहेत त्यांनी काय केलं हे सर्व पाहत आहेत. सगळ्यांनी याचा अनुभव घेतला आहे. भाजपसमोर आता निवडणूक जिंकण्यांचं आव्हान आहे. कर्नाटकात तुम्ही पाहिलं त्यांना बजरंगबलीनेही आशिर्वाद दिला नाही. यामुळे आता त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांच्याकडे पर्याय काय आहे?” India Alliance

इंडिया आघाडीची बैठक आज (1 सप्टेंबर) मुंबईत होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी देशातील 28 विरोधी पक्ष या आघाडीअंतर्गत एकत्र आलेत. India Alliance

पटना आणि बेंगळुरूनंतर मुंबईत होणा री इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक आहे. परंतु अजूनही इंडिया आघाडीला आपला पंतप्रधानपदासाठीचा चेहरा किंवा इंडिया आघाडीचा एक नेता जो या आघाडीचं नेतृत्त्व करेल याबाबत निर्णय घेता आलेला नाही आणि याच मुद्यावरून भाजप सुद्धा आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसते.

इंडिया आघाडीत अनेक दिग्गज, अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. सध्यातरी कोणत्याही एका नावावर आघाडीत एकमत होईल किंवा आताच हे नाव जाहीर केलं जाईल अशी शक्यता कमी असली तरी संभाव्य दावेदार कोण असू शकतात? आणि कोणाचं पारडं किती जड आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

1. राहुल गांधी | India Alliance

India Alliance
  • भारत जोडो यात्रेमुळे प्रतिमा बदलण्यात यश
  • वर्षभरापासून जनसंपर्क वाढवल्यामुळे धरसोड वृत्तीला छेद
  • हिमाचल आणि कर्नाटकातील विजयानंतर भाजपला पराभूत करण्याचा विश्वास निर्माण करण्यात यश
  • कर्नाटकात भारत जोडो यात्रेच्या मार्गावरील मतदारसंघांमधील विजयाचं थेट श्रेय
  • मोदींना घेरण्यासाठी अदानी, चीनच्या घुसखोरीचे मुद्दे लावून धरण्यात सातत्य
  • परंतु गांधी घराण्याचे वारसदार असल्याने घराणेशाहीचा आरोप
  • ‘भारत जोडो’नंतर तयार झालेल्या प्रतिमेत सातत्य राखण्याचं आव्हान
  • विरोधी पक्षांना एकत्र राखण्याचं आणि त्यांच्यासोबत जुळवून घेण्याचं आव्हान

विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात लाट आल्यानंतर राहुल गांधी यांची तुलना त्यांच्यासोबत केली गेली आणि मोदींना राहुल गांधी पर्याय असू शकत नाही असंही बिंबवण्याचा सातत्याने प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसला.

2. मल्लिकार्जुन खर्गे | India Alliance

mallikarjun kharge
  • काँग्रेसमधील सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते
  • संसदीय राजकारणाचा 5 दशकांचा प्रदीर्घ अनुभव
  • केंद्रात अनेक मंत्रिपदं सांभाळण्याचा अनुभव
  • अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर कर्नाटकात आणि हिमाचलमध्ये सत्ता मिळवण्यात यश
  • संघटन कौशल्य आणि स्वच्छ प्रतिमा
  • राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस मिटवण्यात यश
  • राज्यसभेत विरोध पक्षनेते म्हणून यशस्वी कारकिर्द
  • दलित चेहरा असल्याचा इंडिया आघाडीला फायदा होण्याची शक्यता
  • राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेचा अभाव
  • वाढतं वय अडसर ठरण्याची शक्यता

अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांच्यात समतोल साधून राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यात त्यांना यश मिळालं.

तसंच छत्तीसगडमध्येही भूपेश बघेल आणि टी. एस. सिंहदेव तर राजस्थानमध्येही अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समेट घडवण्यात त्यांना यश आलं.

परंतु मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा सावध भूमिका घेतली आहे. यामुळे तीन वेळेला त्यांचं कर्नाटकचं मुख्यमंत्रिपदही हुकल्याची चर्चा होते.

3. शरद पवार | India Alliance

sharad pawar
  • इंडिया आघाडीतील सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते
  • संसदीय राजकारणाचा साडे पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव
  • काँग्रेससह देशातील सर्वच पक्षाध्यक्षांशी सौहार्दाचे संबंध
  • कुशल संघटक आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ओळख
  • केंद्रात अनेक महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव
  • लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव
  • महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं 4 वेळा मुख्यमंत्रिपद
  • भाजपविरोधातील आक्रमक भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
  • महाराष्ट्रातील राजकारणात भाजपबाबत नेहमीच धरसोड वृत्तीचे आरोप
  • पक्ष स्थापनेपासून एकदाही 2 आकडी खासदार संख्या निवडून आणण्यात अपयश
  • राज्यात एकहाती सत्ता आणण्यात अपयश

1967 साली शरद पवार यांनी पहिल्यांदा बारामती येथून लोकसभा निवडणूक लढवली. पंतप्रधानपदाची त्यांची संधी हुकली असली तरी ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले.

जवळपास 52 वर्षांच्या आपल्या सक्रीय राजकारणात त्यांनी कृषी आणि संरक्षण सारखी महत्त्वाची खाती सांभाळली. तर 1998 मध्ये ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते.

शरद पवार प्रयोगशील राजकारण करतात असंही विश्लेषकांचं म्हणणं आहे, पण त्यांचं राजकारण धरसोडीचं आहे अशीही टीका होते.

आताच्या परिस्थितीत पक्ष बांधणीचं सर्वांत मोठं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. पक्षाची पुन्हा नव्याने उभारणी करण्यासाठी ते सध्या राज्यभरात फिरत आहेत.

4. नितीश कुमार | India Alliance

nitish kumar
  • 18 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव
  • केंद्रातील मंत्रिपदांचा अनुभव
  • राष्ट्रीय आघाडीत विविध पक्षांसोबत काम करण्याचं कसब
  • परंतु धरसोड राजकारणामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
  • संधीसाधू राजकारणी असल्याची सतत होणारी टीका

नितीश कुमार यांच्या अशा सततच्या बदलत्या भूमिकांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं.

भाजपबाबतही त्यांची भूमिका कधी एकसमान राहिली नाही. त्यांनी अटलबिहारी वाजपेयीपासून ते लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकाळातील भाजपसोबतही काम केलं आहे. एकेकाळी ते नरेंद्र मोदी यांचेही प्रशंसक राहिले आहेत. पण नंतर त्यांनी त्यांच्यापासूनही फारकत घेतली.

5. ममता बॅनर्जी | India Alliance

mamata banerjee
  • राज्यात आणि देशपातळीवरील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव
  • तब्बल 13 वर्षांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
  • राज्यात पक्षाची सलग तीन वेळा एकहाती सत्ता आणण्यात यश
  • केंद्रीय मंत्रिपदांचा अनुभव
  • यूपीए आणि एनडीए आघाड्यांमध्ये काम करण्याचा अनुभव
  • काँग्रेससोबतच्या संबंधांमध्ये कायम चढ-उतार
  • वेळोवेळी काँग्रेसच्या भूमिकांवर टीका यामुळे इतर पक्षांशी जुळवून घेण्याबाबत संभ्रम
  • एककल्ली कारभार करत असल्याची सतत होणारी टीका
  • पश्चिम बंगालचा चेहरा म्हणून ओळख, पण देशभर लोकप्रियता मर्यादीत

केंद्रातल्या राजकारणाचाही त्यांना अनुभव आहे. देशाच्या पहिल्या महिला रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.

ममता बॅनर्जी आतापर्यंत अधिक काळ युपीएसोबत राहिल्या असल्या तरी 1998 ते 2001 त्या एनडीएसोबत होत्या. यानंतरही 2003 मध्ये त्या एनडीएत होत्या. 2004 मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा युपीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

युपीए आघाडीत असतानाही ममता बॅनर्जी यांनी वेळोवेळी काँग्रेच्या अनेक भूमिकांबाबत आपली असहमती प्रकट केली आहे. यामुळे काँग्रेससोबतही त्यांच्या नात्यात कायम चढ-उतार पहायला मिळाले आहेत.

“यूपीए क्या है? देश में यूपीए का कोई अस्तित्व नहीं है,” 1 डिसेंबर 2021 रोजी मुंबई दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं होतं ज्याची प्रचंड चर्चाही झाली होती.

त्यांनी त्रिपुरा आणि मेघालयमध्ये काँग्रेस आमदारांना फोडून आपल्या पक्षात दाखल करून घेतलं. तर 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकांमुळे आघाडीत कायम राहण्यात किंवा इतर पक्षांशी जुळवून घेण्यात सातत्य नसल्याची त्यांच्याबाबतची प्रतिमा असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तसंच पक्षाचा एकमेव चेहरा असणं किंवा एककल्ली कारभार असण्याचीही त्यांच्यावर टीका केली जाते.

6. अरविंद केजरीवाल | India Alliance

arvind kejriwal

Image Source 

  • दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवण्यात यश
  • भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतरही दिल्लीत भाजपचा दोनदा दारूण परभाव करण्यात मोठं यश
  • अनेक राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव
  • केवळ 10 वर्षांत आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात यश
  • राष्ट्रीय नेते म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला मर्यादा
  • आघाडीतील इतर बलाढ्य नेत्यांच्या तुलनेत अनुभवाची कमतरता

पण पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा जेव्हा विषय येतो त्यावेळी मात्र अरविंद केजरीवाल यांच्याबाबत जाणकारांमध्ये मतमतांतरं दिसून येतात. केजरीवाल यांना देशपातळीवर स्वीकार्हता आहे का? हा मोठा प्रश्न आहे. तसंच देशाचे नेते म्हणून अद्याप त्यांची तशी प्रतिमा नसल्याचं दिसतं.

इंडिया आघाडीत विविध पक्षांचे दांडगा अनुभव असलेले नेते असताना त्यांच्याशी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी स्पर्धा करायची झाल्यास तुलनेने केजरीवाल यांचा अनुभव कमी आहे हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा ठरतो.

आघाडीतील नेत्यांच्या राजकारणाचा पूर्वानुभव पाहता येत्या काळात आघाडीत अंतर्गत राजकारणही दिसू शकतं, अशीही शक्यता किडवई यांनी व्यक्त केली.

ते सांगतात, “काही पक्ष एकमेकांना मदत करतील, काही पक्षांचे अघोषित गट असतील, हे यापूर्वीही आम्ही पाहिलं आहे. आपल्या राज्यातील इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन नंतर जागांचा आकडा आमचा जास्त आहे असेही दावे होतील.”

पण हेही तितकच आहे की, देशाच्या पातळीवर मान्य होईल असा चेहरा सध्या या आघाडीतल्या इतर पक्षांकडे नाही. या यादीत राहुल गांधी सोडून इतर नेत्यांच्या देशपातळीवरील स्वीकार्हतेचा मुद्दा कळीचा आहे.

त्यामुळे ही आघाडी आता त्यांच्या मुख्य उद्देशाकडे लक्ष केंद्रित करून एकसंध राहून निवडणुकांना सामोरं जाते की चेहऱ्याच्या शोधातच गुरफटून जाते हे पाहण्यासाठी घोडामैदान फार दूर नाहीच…

हेही वाचा

INDIA Alliance Meet : इंडिया आघाडीच्या बैठकीतील नेत्यांसाठी मराठमोळ्या पदार्थांचा बेत

Gautam Adani | बाजार उघडताच Adani समूहाचे शेअर्स गडगडले

Prakash Ambedkar | आम्हाला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही – प्रकाश आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *