Vikram Lander | 2 सेकंदही उशीर झाला असता तर लँडर कोसळलं असतं

Vikram Lander

Image Source

Vikram Lander | नासाच्या चंद्र मोहिमेला तत्कालिन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी मान्यता दिली होती. पण अंतराळ मोहिमेबाबत ते फारसे उत्साही नव्हते.

1962 मध्ये जेव्हा केनेडी नासाचे तत्कालीन प्रमुख जेम्स वेब यांना भेटले तेव्हा त्यांनी वेब यांना सांगितलं, “मला अंतराळात अजिबात रस नाही. मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे.” Vikram Lander

“मला वाटतं आम्हाला अंतराळाची माहिती असायला हवी. यासाठी आम्ही काही रक्कम खर्च करण्यासही तयार आहोत. पण, तुम्ही जेवढे पैसे मागत आहात त्यामुळं आमचं बजेट कोलमडेलं.”

केनेडी आणि नासाचे प्रमुख यांच्यातील हा संवाद जॉन एफ केनेडी प्रेसिडेन्शिअल लायब्ररी या केनेडी यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील कागदपत्रांच्या लायब्ररीतून प्रसिद्ध केला आहे. Vikram Lander

या संभाषणात केनेडी यांचा चंद्रावर पोहोचण्यामागचा खरा हेतू स्पष्ट होतो. Vikram Lander

केनेडी यांनी पुढे जेम्स वेब यांना सांगितले, “मला वाटतं की आपण हा कार्यक्रम अशा कालमर्यादेमध्ये तयार केला पाहिजे की आपण त्यांना पराभूत करू शकू. आम्ही त्यांना दाखवू शकतो की आम्ही अंतराळ तंत्रज्ञानात अनेक वर्षे मागे असूनही आम्ही त्यांना हरवू शकतो.”

म्हणजेच केनेडींनी जेव्हा नासाला चंद्र मोहिमेवर जाण्यासाठी हिरवा कंदील दिला तेव्हा या क्षेत्रात सोव्हिएत युनियनला मात देण्याचा त्यांचा उद्देश होता.

पण, अमेरिकेला ही शर्यत जिंकणं महाग पडलं होतं. त्यावेळी अपोलो मोहिमेचा एकूण अंदाजे खर्च अंदाजे 25 अब्ज डॉलर इतका होता. आजच्या नुसार, ही रक्कम सुमारे 175 अब्ज डॉलर आहे. 1965 मध्ये अमेरिकेच्या एकूण बजेटमध्ये नासाचा वाटा 5 टक्के होता. आज ते केवळ अर्धा टक्के आहे.

अमेरिकेने ते अब्जावधी डॉलर रॉकेट्स, स्पेसक्राफ्ट, कॉम्प्युटर, मिशन कंट्रोल रूम आणि चार लाख लोकांचे पगार यासाठी खर्च केले होते. आणि यामध्ये केवळ 12 लोकांना चंद्रावर नेण्यात आलं.

चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी नासाने खर्च केलेला पैसा योग्य होता का? या प्रश्नावर अमेरिकन नागरिकांचे उत्तर नकारार्थी होते. 1967 मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचा संदर्भ घेऊन आम्ही हे सांगत आहोत.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे रॉजर लॉनियस यांनी ही आकडेवारी गोळा केली. जी स्पेस पॉलिसी जर्नल नावाच्या मासिकात प्रकाशित झाली होती. यानुसार, अमेरिकन लोकांचा असा विश्वास होता की आपल्या देशाचं प्राधान्य अंतराळ शर्यतीत भाग घेण्यास नसावं.

1961 मध्ये, जेव्हा सोव्हिएत युनियन अंतराळ शर्यतीत अमेरिकेपेक्षा खूप पुढे होतं, तेव्हाही अमेरिकन जनतेला अवकाश मोहिमेवर इतका पैसा खर्च करण्यात रस नव्हता.

जून 1961च्या सर्वेमध्ये, अर्ध्या अमेरिकन लोकांनी सोव्हिएत युनियनला पराभूत करण्यासाठी चंद्र मोहिमेचे समर्थन केलं, तर उर्वरित अर्ध्या लोकांनी याला पैशाचा अपव्यय म्हटलं.

जानेवारी 1967 मध्ये अपोलो 1 च्या दुर्घटनेत तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाल्यानंतर, अर्ध्याहून अधिक अमेरिकन चंद्र मोहिमेच्या विरोधात होते.

1969 मध्ये मानव चंद्रावर पोहोचू शकल्यानंतर सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांमध्ये अपोलो मोहिमेला पाठिंबा वाढला. पण 9 महिन्यांनंतर अपोलो-13 चा अपघाता झाला आणि पुन्हा एकदा अमेरिकन जनमत त्याच्या विरोधात गेलं.

Vikram Lander

Image Source : NASA

जीन सर्नन आणि हॅरिसन श्मिट जेव्हा अपोलो 17 मोहिमेद्वारे चंद्रावर चालत होते, तेव्हा सुमारे 60 टक्के अमेरिकन लोकांचा असा विश्वास होता की त्यांचं सरकार अंतराळ क्षेत्रात खूप पैसा खर्च करत आहे. तोपर्यंत यूएस सरकारनं नासाचं बजेट खूप कमी केलं होतं आणि उर्वरित चंद्र मोहिमाही रद्द केल्या होत्या.

नासाच्या अपोलो मोहिमेला राष्ट्रीय अभिमान मानलं जात होतं आणि त्याला अमेरिकन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता हे एक मिथक आहे. त्या काळातील या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवला, तर आपण या निष्कर्षाप्रत पोहोचतो की, अवकाश मोहिमेऐवजी आपल्या कराचा पैसा इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च व्हावा, अशी सरासरी अमेरिकन नागरिकांची इच्छा होती.

जेव्हा नासा चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या योजनेवर काम करत होता, तेव्हा तेथे जाणाऱ्यांसाठी खास कपडे डिझाइन करणं हे एक मोठं आव्हान होतं. त्यांना स्पेस सूट म्हणतात.

नासाच्या अभियंत्यांना मजबूत आणि आरामदायी स्पेस सूट बनवायचे होते. नासानं स्पेससूट बनवण्याची जबाबदारी ब्रा बनवणाऱ्या इंटरनॅशनल लेटेक्स कॉर्पोरेशनवर सोपवली होती. प्रत्येक स्पेससूटमध्ये प्लास्टिकचे तंतू, रबर आणि धातूच्या तारांचे अनेक स्तर होते. या सगळ्याच्या वर ‘टेफ्लॉन’च्या कापडाचा थर लावला होता. हे स्पेस सूट खास टेलर कडून हातानं शिवलेले होते.

यामध्ये लाइफ सपोर्ट सिस्टिम जोडण्यात आली. त्यामुळे प्रत्येक स्पेस सूट अंतराळयाना सारखा झाला होता. यामध्ये प्रत्येक जॉइंट इतका लवचिक बनवण्यात आला होता की अंतराळवीरांना त्यांचे हात आणि पाय हलवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अपोलो मोहिमांसाठी डिझाइन केलेले स्पेस सूट नासाच्या जेमिनी मोहिमे पेक्षा कितीतरी पटीने चांगले होते.

अंतराळ कार्यक्रमापासून वेगळे झाल्यानंतर अनेक अंतराळवीरांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पगारावर नोकरी मिळाली. अनेकजण टीव्हीवर गेस्ट म्हणून जाऊ लागले. याशिवाय त्यांना अनेक जाहिरातीही करायला मिळाल्या. Vikram Lander

उदाहरणार्थ, अपोलो 7 मोहिमेदरम्यान सर्दी झालेल्या वॅली शिरा नंतर सर्दीमूळ बंद झालेलं नाक मोकळं करणाऱ्या औषधाची ब्रँड अॅम्बेसेडर बनल्या. अशा प्रकारे बझ एल्ड्रिन यांनी विमा, कार आणि ओट्सच्या जाहिराती केल्या. आजही त्यांचं उत्पन्न त्यांनी 1969 मध्ये कमावलेल्या कमाईपेक्षा जास्त आहे. Vikram Lander

हेही वाचा

G20 summit | मोठा आंतरराष्ट्रीय नेता G20 परिषदेसाठी भारतात येणं टाळणार ?

PM Modi Speech | चंद्रयान-3 उतरलेल्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *