Allu Arjun | अल्लू अर्जुनला 2021च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या चित्रपटांविषयी बोलताना ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या आधी आणि नंतर असे दोन भाग पडल्याचं दिसतं. ‘गंगोत्री’ या पहिल्या चित्रपटापासून ‘पुष्पा’पर्यंतचा अल्लू अर्जुनचा प्रवास कसा राहिला आहे, याचा हा आढावा…
कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते अल्लू अर्जुनला प्रेमाने ‘बनी’ म्हणतात.
Allu Arjun ने गेल्या 19 वर्षांमध्ये 14 दिग्दर्शकांसोबत 22 चित्रपट केले असून त्यातील 19 चित्रपटांनी तिकीटखिडकीवर जोरदार कमाई केली. अर्थात, त्याच्या कारकीर्दीचा अंदाज केवळ या आकडेवारीवरून येणार नाही. ‘गंगोत्री’ या पहिल्या चित्रपटापासून त्याच्या अभिनयामध्येही महत्त्वाचा बदल होत आलेला आहे.
सर्व प्रकारच्या तेलुगू प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश होतो. ‘पुष्पा’ या नुकत्याच गाजलेल्या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांनाही तितकंच प्रभावित केल्याचं दिसून येत आहे..
Allu Arjun
- ‘पुष्पा सिनेमाने हिंदीत ‘या’ कारणांमुळे कमावला कोट्यवधींचा गल्ला
- ‘पुष्पा’ सिनेमात दाखवलेलं रक्तचंदन नेमकं काय असतं? त्याची एवढी तस्करी का होते?
- ‘झुकेगा नहीं’ म्हणत साउथ इंडियन सिनेमा बॉलिवूडला कसं आव्हान देतोय?
Allu Arjun चा पहिला चित्रपट ‘गंगोत्री’ मार्च 2003 मध्ये प्रदर्शित झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. पहिल्या चित्रपटामध्ये अभिनय करत असताना अल्लू अर्जुनला त्याचे वडील आणि आघाडीचे निर्माते अल्लू अरविंद यांचा आणि त्याचे मामा अभिनेते चिरंजीवी यांचा मोठा आधार लाभला होता. परंतु, त्यानंतरचं यश मात्र त्याने स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं आहे.
‘गंगोत्री’मधील अजाण सिंहाद्री हे पात्र आणि ‘पुष्पा’मधील पुष्पाराज हा सराईत तस्कर यामध्ये बराच फरक आहे. ‘गंगोत्री’ प्रदर्शित झाला तेव्हा अल्लू अर्जुन केवळ 21 वर्षांचा होता. नवोदित कलाकार म्हणून त्याचा स्वतःचा अजाणपणा आणि अवघडलेपणा चित्रपटातील पात्राच्याही स्वभावाशी जुळणारा होता.
पहिल्या चित्रपटातील त्याच्या कामावर बरीच टीका झाली. पण, पुढच्याच वर्षी आलेल्या ‘आर्या’ या चित्रपटात मात्र त्याने स्वतःच्या अभिनयाने टीकाकारांना आपलंसं केलं.
Allu Arjun
Allu Arjun ने पडद्यावर रंगवलेली बहुतांश पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. ‘आर्या’, ‘आर्या 2’, ‘हॅपी’, ‘जुलाई’, या चित्रपटांमध्ये त्याने लोकांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणाऱ्या उत्साही भूमिका केल्या, तर ‘परुगू’, ‘वेदम्’, ‘वरुडू’ या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका लोकांच्या डोळ्यांमधून अश्रू आणणाऱ्या होत्या.
अल्लू अर्जुन प्रत्येक पात्रावर स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याचा चित्रपट भरपूर कमाई करणारा ठरला, तरी तो अत्यानंदी होत नाही किंवा एखाद्या चित्रपटाने खराब कामगिरी केली, तरी निराश होत नाही. ‘ना पेरू सूर्या’ या चित्रपटाचं अपयश त्याने उमदेपणाने स्वीकारलं.
तुलनेने अल्लू अर्जुनच्या चित्रपटांमधील कारकिर्दीवर कमी टीका झालेली आहे. पण 2016 साली हैदराबादमध्ये चित्रपटांशी संबंधित एका कार्यक्रमात त्याने केलेलं विधान टीकेचं लक्ष्य ठरलं होतं. ‘मेगास्टार’ चिरंजीवीचा धाकटा भाऊ आणि विख्यात अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल काही बोलावं, अशी मागणी त्या कार्यक्रमात उपस्थित चाहत्यांनी Allu Arjun कडे केली. पण Allu Arjun म्हणाला, “भावा, मी यावर काहीच बोलणार नाही.” त्याचे हे उद्गार उद्धटपणाचे मानले गेले आणि पवन कल्याणच्या चाहत्यांनी त्यावर जोरदार टीका केली.
Allu Arjun मायकल जॅक्सनचा चाहता
अल्लू अर्जुनच्या बाबतीत बोलताना त्याचा डान्स पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो. ‘पुष्पा’मधील ‘श्रीवल्ली’ या गाण्यात त्याची स्लिपर पायातून निसटते आणि तो पुन्हा त्या दिशेने जात ती स्लिपर पायात घालतो. ही स्टेप देशभरात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक विख्यात व्यक्तींपासून ते लहान मुलामुलींपर्यंत सर्वांनी या स्टेपचं अनुकरण करणारे व्हीडिओ बनवले होते.
‘आला वैकुंटपुरामुलो’ या चित्रपटातील ‘बुट्ट बोम्मा’ या गाण्यामधील अल्लू अर्जुनचा डान्सही असाच प्रसिद्ध झाला होता. प्रत्येक चित्रपटात त्याची अशी एक खास स्टेप असते.
लहानपणापासूनच अल्लू अर्जुनला डान्सची भरपूर आवड होती. लहानपणी त्याच्या बेडरूममध्ये फक्त मायकल जॅक्सन आणि चिरंजीवी या दोघांचीच छायाचित्रं होती, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
या दोघांकडून आपण खूप काही शिकल्याचंही तो म्हणाला. मायकल जॅक्सनचा तो कट्टर चाहता आहे.
Allu Arjun ने ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘मैं झुकेगा नही, साला’ या संवादासारखे अनेक खटकेबाज संवादही अल्लू अर्जुनच्या नावावर आहेत.
Allu Arjun च्या चाहत्यांची केरळमध्ये प्रचंड संख्या आहे. इतर भाषांमधील प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असलेल्या तेलुगू अभिनेत्यांच्या यादीत अल्लू अर्जुनचं स्थान सर्वोच्च आहे. तेलुगू खालोखाल मल्याळी भाषेतही अल्लू अर्जुनला खूप लोकप्रियता लाभली. केरळमध्ये मल्याळी तारेतारकांच्या चित्रपटांसोबत अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची अटीतटीची स्पर्धा होताना दिसते. केरळमध्ये 2018 साली पूर आला, तेव्हा अल्लू अर्जुनने मदतकार्यासाठी देणगी दिली होती.
Allu Arjun ने डबिंगद्वारे हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली
‘पुष्पा’ चित्रपट हिंदी मध्ये इतका प्रचंड यशस्वी होईल, असं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किंवा प्रदर्शनावेळीसुद्धा कोणाला जाणवलं नव्हतं. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अल्लू अर्जुनचा चेहरा हिंदी हिंदी चित्रपटसृष्टीत परिचयाचा झालेला होता.