Gashmeer Mahajani | वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनी पुन्हा एकदा व्यक्त

Gashmeer mahajani

Image Source

उत्तर देताना Gashmeer Mahajani लिहिलं, ‘हातात मोबाइल आणि मोफत डेटा असलेली व्यक्ती त्याच्या अंधाऱ्या खोलीत बसून एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल काहीही मतं मांडू शकते. तेसुद्धा खरं काय घडलंय याची काहीच माहिती नसताना.’

अभिनेता Gashmeer Mahajani  इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. जुलै महिन्यात गश्मीरचे वडील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं होतं. यावेळी ते कुटुंबापासून दूर एकटेच तळेगाव इथल्या एका सदनिकेत राहत होते. या घटनेनंतर गश्मीर आणि त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने नेटकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने त्याच्या आईच्या प्रकृतीविषयीही अपडेट्स दिले आहेत.

‘तुमची आई आता ठीक असेल अशी अपेक्षा करतो’, असं एकाने म्हटलं. त्यावर गश्मीरने लिहिलं, ‘आजच आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ती सध्या फिट अँड फाइन आहे.’ त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी प्रश्न विचारल्यावर गश्मीरने उत्तर दिलं, ‘होय, खूप प्रोजेक्ट्स आहेत. पण गेल्या आठवड्यात आईची प्रकृती खालावल्याने तिची काळजी घेण्यात व्यग्र होतो. आता ती ठीक आहे. पुढील पंधरा दिवसांत मी कामावर परतेन.’

‘काही दिवसांपूर्वी तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यावर ट्रोल करणाऱ्यांना काय उत्तर देशील’, असाही सवाल गश्मीरला एका नेटकऱ्याने केला. त्यावर त्याने लिहिलं, ‘कधीकधी मला उत्तर द्यायची इच्छा होते. पण मग विचार येतो की का? ते माझं आयुष्य जगत नाही आणि जरी त्यांची इच्छा असली तरी ते माझं आयुष्य जगू शकत नाहीत. त्यामुळे शांत राहणंच योग्य आहे. त्यांच्याकडे मोकळा वेळ आहे, पण मला बऱ्याच लोकांची काळजी घ्यायची आहे आणि माझ्या हातात बरंच कामसुद्धा आहे.’

Gashmeer Mahajani

Also Check

Ishalwadi | ईशाळवाडी पुनर्वसनासाठी बालाजी फाउंडेशनकडून २५ लाखांची मदत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *