अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क|| सोलापूर : स्वाभिमानी ढोर समाजाला बदलत्या शैक्षणिक आणि आरक्षण धोरणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत देशपातळीवर समाजात जनजागृती व्हावी, या हेतुने रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत देशव्यापी भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. ढोर समाजाचे महामेरू भारताचे माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह देशभरातील ढोर समाजाचे नेते, पदाधिकारी मोठ्यासंख्येने या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचे रक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावणारे संत वीर कक्कय्या…